भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

बोदवळमुक्ताईनगरराजकीय

राष्ट्रवादी बळकटीसाठी रोहिणी खडसेंची सवांद यात्रा एक यशस्वी पाऊल– जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील

मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्यूज प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बोदवड तालुक्यातील राजूर, वरखेड बु, वरखेड खुर्द, निमखेड, एनगाव या गावात जनसंवाद यात्रेचा चौथ्या दिवशी ग्रामस्थांशी संवाद साधण्यात आला.

यावेळी यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील म्हणाले, मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातील नवीन -जुन्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवाराचे हात बळकट करण्यासाठी सौ रोहिणी खडसे यांच्या संकल्पनेतून सुरु असलेली जन संवाद यात्रा ही महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे. कोणत्याही निवडणुका डोळ्यासमोर नसताना केवळ मतदारांशी संवाद साधून वैयक्तिक समस्यासह गावोगावच्या अडिअडचणी जाणून घेण्याच्या उद्देशाने  सुरु असलेली ही संवाद यात्रा राज्यासाठी मॉडेल ठरू शकते, त्यांच्या मनातही विकासाची तळमळ असल्याचे यावरून दिसून येते. रोहिणी खडसेंनी उचललेले हे पाऊल निश्चितपणे दिशादाई असून अभिनंदनीय आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत झालेली चूक पुन्हा करू नका,आता यापुढे रोहिणीताईंच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहा “असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पाटील यांनी केले.

प्रसंगी, नाथाभाऊ जरी राज्याचे आमदार असले तरी त्यांच्या आमदार निधीवर आपला मतदार संघ सर्वात जास्त हक्कदार असून गेल्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आपल्याकडून चूक झाली, तेव्हा झालेली चूक आता सुधारण्याची गरज निर्माण झाली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या भरवशावर विजयी झालेला आमदार जो शरदचंद्र पवार यांना झाला नाही, जो शिवसेनेला झाला नाही तो जनसामान्यांना काय होणार? असा प्रश्न करत यापुढे भक्कमपणे रोहिणी खडसेंच्या पाठीशी उभे राहायचे आहे असे त्यांनी सांगितले. यात्रे दरम्यान विधानपरिषदेचे आमदार एकनाथराव खडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, यात्रेत जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे,व्हिजेएनटी सेल जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडीया, बोदवड राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष आबा पाटील,मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष यु डी पाटील सर, जामनेर तालुका अध्यक्ष विलास राजपुत, राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष दिपक पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रदिप बडगुजर, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील,

बाजार समिती संचालक रामदास पाटील, नगरसेवक भरत अप्पा पाटील, जाफर शेख, दिपक झंबड, हकीम बागवान, मुजमिल शाह, माजी प स सभापती किशोर गायकवाड, अनिल वराडे, अनिल पाटील, भागवत टिकारे, दिपक वाणी, युवक तालुका अध्यक्ष विनोद कोळी, गोपाळ गंगतिरे, सम्राट पाटील, निलेश पाटील, शिवाजी ढोले, विलास देवकर, वामन ताठे, डॉ ए एन काजळे,विजय चौधरी, जितेंद्र पाटील, प्रमोद धामोळे, रामराव पाटील, रवी खेवलकर, श्याम पाटील, फिला राजपूत, वाय डी पाटील,आनंदा पाटील, नईम बागवान,भगतसिंग पाटील, मुकेश कर्हाळे,कृष्णा पाटील, अजयसिंग पाटील, संदिप देशमुख, प्रदिप साळुंखे, अतुल पाटील, बाळाभाऊ भालशंकर, रणजित गोयनका, बबलू सापधरे, नंदकिशोर हिरोळे, चेतन राजपूत, संदिप पाटील, भैय्या पाटील, विकास पाटील, वंदना पाटील, प्रतिभा खोसे, कविता गायकवाड, ग्रामस्थ व या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!