सावदा येथील आढावा बैठकीत आ. चंद्रकांत पाटील याचे समोर नागरिकांनी वाचला तक्रारीचा पाढा
मंडे टू मंडे वृत्तसंकलन ।
सावदा,मंडे टू मंडे वृत्तसेवा। सावदा येथे दि, ३ रोजी कोचूर रोडवरील नगर पालिकेच्या सभागृहात मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सावदा शहरातील विविध समस्या जाणून घेण्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडल्या प्रामुख्याने यात पालिका क्षेत्रात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या सोमेश्वर नगर, निमजाय माता नगर, कृषी उत्पन्न बाजार समिती मागील भाग येथील नागरिकांनी या भागात रस्ते ,पिण्याचे पाणी, स्वच्छता आदी बाबत तक्रारी मांडल्या.
यावेळी मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी सदर भाग नव्याने पालिका हद्दित समाविष्ट झाला असून येथे पाणी पुरवठा व्यवस्थित व्हावा यासाठी योजना मंजूरी साठी टाकली असून त्याचा टी,पी,आर, मंजूर झाला आहे बाकी प्रोसेस सुरू असून योजना मंजूर झाल्यावर येथे काम होईल तो पर्यंत येथे पाईप लाईन टाकून मग रस्त्याचे काम लवकर सुरु करू म्हणजे याकाम साठी परत रस्ते खोदावे लागणार नाही सोबत गटारीचे काम देखिल सुरु करणार आहोत, तसेच याभागात स्वच्छते साठी घण्टा गाडी ची व्यवस्था त्वरीत करण्यात येईल तसेच त्वरित स्ट्रीट लाइट देखील बसविण्यात येतील असे सांगितले तर आ, चंद्रकांत पाटील यांनी सदर पाणी पुरवठा योजन बाबत आपण स्वत: त्वरीत पाठपुरावा करून सदर योजना मार्गी लाऊ असे सांगितले व याच वेळी त्यांनी सदर कमा बाबत वरिष्ठ अधिकारी यांचेशी भ्रमणध्वनी वरुन संपर्क साधुन तश्या सूचना केल्या.बुधवार पेठ परिसरात मोकाट डूकारांचा त्रास वाढला असून बंदोबस्त करण्याची मागणी केली,तसेच नागरिकांनी लॉकडाउन मुळे आर्थिक परिस्थिति खराब असताना सक्तिची विज बिल वसूली होत असल्या बाबत तक्रार मांडली तेव्हा सक्तिची बिल वसूली करू नका नागरिकांना त्यांचे हफ्ते पाडून दया अश्या सूचना महावितरणच्या अधिकारी यांना केल्या सर्व तक्रारी लवकरात लवकर त्या त्या वीभगाने सोडवाव्या अश्या प्रकारच्या सूचना केल्या गेल्या.
यावेळी आ, चंद्रकांत पाटील यांचे सोबत नगरसेवक राजेश वानखेडे, नगरसेवक राजेंद्र चौधरी,फिरोजखान पठाण शे, अल्लाबक्ष, नगरसेविका मीनाक्षी कोल्हे, विजया जावळे, नगरपालिका मुख्याधिकारी सौरभ जोशी, से.पो.नी. देवीदास इंगोले,महावितरण तर्फे अभियंता सुहास चौधरी, हेमंत खांडेकर, महसूल मंडळ अधिकारी संदीप जैसवाल, तलाठी शरद पाटील यांचे सह धांनजय चौधरी, मिलींद पाटील,सुरज परदेशी ,भारत नेहेते,शाम पाटील,शरद भारंबे,निलेश खाचने, शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक कार्यकर्ते,गावातील महिला व पुरुष आदी हजर होते.