सावदा येथे कॉम्प्युटराईज लॅबोरेटरी धारकाकडून रक्ताचा नमुना घेताना महिलेचा विनयभंग
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
सावदा ,मंडे टू मंडे वृत्तसेवा। रावेर तालुक्यात सावदा येथे महिलेचा रक्ताचा नमुना घेताना शहरातील राणे भंडारी कॉम्प्लेक्स मधील कॉम्प्युटराईज लॅबोरेटरी
धारकाने एका महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार दि.४ सप्टेंबर रोजी घडला.
याबाबत अधिक माहिती अशी की, सावदा शहरातील राणे भंडारी कॉम्प्लेक्स मधील सदरील कॉम्प्युटराईज लॅबोरेटरी धारकाने एका तरुण विवाहित महिलेशी रक्त तपासणी साठी रक्ताचा नमुना घेताना महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याने सदरील लॅबधारकास त्या ठिकाणी चांगलाच चोप देण्यात आला .या बाबत शहरात सर्वत्र मोठी चर्चा ही सुरू आहे . तसेच जवळपास गेल्या आठ महिन्यापूर्वी सुद्धा सदरील लॅब धारकाने असेच कृत्य केल्याची माहिती मिळत आहे. सदरील घटनेबाबत महिलेने पोलीस स्थानकात तक्रार देण्यास नकार दिल्यामुळे लॅबधारकाने केलेल्या गैर कृत्याला घेऊन काही अप्रिय घटना घडू नये म्हणून सावदा पोलिस स्थानकात त्याच्याविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करण्यात आली.