भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

हतनूर धरणाचे ४१ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

सावदा,मंडे टू मंडे वृत्तसेवा। जळगाव जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उपनद्यांना पूर आला. तिकडे तापीच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाने हतनूर धरण भरले असून, आज दुपारी १ वाजेला हतनूर धरणाचे ४१ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहे. त्यामुळे धरणातून ८२ हजार १७८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पावसाळ्याच्या शेवटच्या महिन्यात जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरीसह सर्वसामान्य सुखावला आहे. गेल्या आठवड्यात तहानलेली जिल्ह्यातील धरणे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून दमदार बरसत असलेल्या पावसाने ‘ओव्हरफ्लो’ झाली आहेत. रात्री २ वाजता मण्याड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली असल्याने धरणातून अंदाजे ६० ते ७० हजार क्युसेक विसर्ग चालू आहे. तर अंजनी मध्यम प्रकल्प, या धरणाची सध्याची पाणी पातळी 52 % असून धरण फक्त 4 ते 5 फूट खाली आहे. सायंकाळी अंजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु झालेला असल्याने धरणात 52 % टक्के पाणीसाठा झालेला आहे. धरणाच्या पाणीसाठ्यात सतत वाढ होत आहे.

दरम्यान, हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रावरील भागात पाऊस सुरु असून पूर्णा नदीलाही पूर येत आहे. त्यामुळे पाणी पातळी सतत वाढल्याने धरणातील आवक ही वाढत आहे. आज दुपारी धरणाचे ४१ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहे.त्यामुळे तापीला पूल आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!