तब्बल ६ वर्षानी सावदा रेल्वेस्टेशनच्या माल धक्क्यावरून दिल्लीकडे केळी रवाना..
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
सावदा (प्रतिनिधी)। संपूर्ण देशात केळी साठी प्रसिद्ध असलेल्या व बनाना सिटी म्हणून ओळख असलेल्या सावदा येथून गत 6 वर्षापासून रेल्वे व्दारे दिल्ली सह देशात विविध ठिकाणी पाठविण्यात येणारी केळी वाहतूक बंद होती परंतु तब्बल सहा वर्षांनी रेल्वे ने रेल्वे गाडीला किसान रेल्वे म्हणून केळी ची संकल्पना समोर आणली व यातून केळीची वाहतूक सुरुवातीस १२ जानेवारी रोजी दिल्लीला व्हीपीयु प्रकारच्या सहा वॅगन्स या प्रायोगिक तत्त्वावर दिल्लीला पाठवण्यात आल्या होत्या यात चांगले यश आल्याने तसेच यास व्यापाऱ्यांचा चांगल्या प्रतिसाद लाभल्याने दिनांक १६ रोजी १८ वॅगन्स पाठवण्यात आल्या आहेत
४४ टन केळी रवाना–
येणाऱ्या काळात समस्त व्यापारी वर्गाकडून यात सातत्य राखले जाऊन केळी रेल्वेने पाठवली जाईल यात यावल, तांदलवाडी, वाघोदा, फैजपूर, सावदा, निंभोरा, रावेर येथील तब्बल डझनभर व्यापाऱ्यांनी एका बॉक्स मधे तेरा किलोप्रमाणे चौदाशे एक्सपोर्ट बॉक्स मध्ये भरून २३ टन केळी तर काही व्यापाऱ्यांनी मोकळ्या केळीच्या घडा प्रमाणे एका वॅगन्स मध्ये २१ टन केळी अशी एकूण ४४ टन म्हणजेच सुमारे चार हजार चारशे क्विंटल केळी सावदा येथून भुसावळ येथे रात्री रवाना केली आहे केळी भरलेली रेल्वे वँगन्स रात्री उशिरा भुरुच गुजरात येथुन फळे व भाजीपाल्याने भरलेल्या किसान रेल्वे ला जोडून दिल्ली येथे आजादपुर मंडी रेल्वे स्थानकावर पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट बॉक्समध्ये केळी भरुन दिल्लीला रवाना करण्यात आली असून याआधी २०१४ मध्ये रेल्वे रॅकमध्ये सुटे घड व कॅरेटमध्ये केळी रेल्वेने दिल्लीला पाठवण्यात आली होती
रेल्वे भाड्यात निम्मे तफावत –
आधी दिल्ली ते सावदा रेल्वेचे भाडे एका वॅगन साठी सुमारे ६९८००रुपये आकारले जात होते परंतु किसान रेल्वे अंतर्गत सावदा ते दिल्ली २३ टन साठी सवलतीने दिल्यामुळे तेच भाडे अर्ध्यावर आले असून आता ३६१४० रुपये आकारणात येत आहे रेल्वेने भाडे कमी केल्यामुळे याचा थेट फायदा व्यापाऱ्यानां होणार आहे
२० तासात होणार दिल्ली वारी –
मालट्रक ने दिल्लीला केळी पाठवायची झाल्यास सुमारे सत्तर तासाचा अवधी लागतो तर रेल्वेने दिल्लीला केळी पाठवायची झाल्यास २० तासाचा अवधी लागतो त्यामुळे वेळ व पैसा याचा व्यापाऱ्यांना पुरेपूर फायदा होणार आहे तसेच तीदेखील ताजीच दिल्लीला पोहोचणार आहे, दरम्यान सावदा येथून नियमित रेल्वे व्दारे होणारी केळी वाहतूक बंद झाल्या नंतर येथील मालधक्का ओस पडला होता पण १६ रोजी बऱ्याच काळा नंतर येथून रेल्वे ने केळी रवाना झाल्याने हा मालधक्का पुन्हा एकदा गजबजलेला दिसला. यामुळे येथील मजूरांचे हाताला देखील काम मिळाले
मागणी मोठ्या प्रमाणात पण रेल्वेकडून पुरवठा कमी –
भारत सरकारच्या किसान रेल्वे योजनेअंतर्गत सावदा ते दिल्ली तेवीस टन च्या एका वॅगन चे भाडे ३६ हजार १४० रुपये असून मात्र तेच भाडे रस्ते वाहतूक मालट्रक द्वारे करायचे झाल्यास १० टन साठी ४१ हजार रुपये एवढे आहे भाड्यात दुप्पट तफावत असल्यामुळे व्यापाऱ्यांकडून रेल्वे वँगन्सची मोठ्या प्रमाणात मागणी होत असून मागणीच्या ५० टक्के एवढीच वँगन्स सध्या उपलब्ध होत आहेत त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावं व पुरेपूर वँगन्स उपलब्ध करून द्यावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे वैगन्स उपलब्ध झाल्यास मोठ्या प्रमाणात केळी निर्यात होईल तसेच रेल्वे ला देखील उत्पन्न मिळणार असल्याने ही संकल्पना पुढे सुरु रहावी अशी अपेक्षा देखील व्यक्त केली जात आहे,