भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

सफाई कामगारांचे प्रश्र्न सोडवा- बेटी बचाओ च्या जिल्हा संयोजक सारीका चव्हाण याची मागणी

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

सावदा,मंडे टू मंडे वृत्तसेवा। सावदा श‌हरातील सफाई कामगारांनचे प्रश्र्न व समस्या निराकरण करण्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील,माजी जलसंपदामंत्री आ.गिरीष महाजन तसेच सावदा नगर पालिकेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांना बेटी बचाओ बेटी पढाओ च्या जिल्हा संयोजक सारीका चव्हाण यांच्या वतीने निवेदन देण्यात आले

निवेदनात , निरक्षर सफाई कामगारांना बारा वर्षे सेवेनंतर मिळणारी कालबद्ध पदोन्नती अश्वसित प्रगती योजना मिळावी.तसेच २५ वर्ष सेवा झालेल्या कामगारांना डॉ बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य आवास योजनेचे फायदे मिळावे,मंगल कार्यालय बांधून मिळावे.अशा अनेक मागण्या निवेदनात नमूद असून त्याप्रसंगी बेटी बचाओ बेटी पढाओ च्या जिल्हा संयोजक सारीका चव्हाण यांच्या सह सफाई कर्मचारी धिरज करोसिया, अर्जुन करोसिया,विनय करोसिया, विलास करोसिया, आकाश करोसिया, शंकर करोसिया,विशाल करोसिया व समाजबांधव उपस्थित होते

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!