सावद्यात “खंडेराव” देवस्थान सभामंडपाचे भूमिपूजन
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
सावदा,मंडे टू मंडे वृत्तसेवा।
येथील स्थानिक व परिसरातील भक्त गणाचे श्रद्धास्थान असलेल्या पुरातन खंडोबा देवस्थान (मंदिर) येथे आज रोजी सकाळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे हस्ते सभामंडपाचे भूमिपूजन संपन्न झाले. सावदा येथे पुरातन कालापासून असलेले खंडोबा देव, म्हाळसा व बानु देवी यांचे मंदिर स्थित आहे. तसेच परिसरातील लोकांचे कुलदैवत सुद्धा आहे. याठिकाणी दरवर्षी चंपाषष्ठीला मोठी यात्रा भरत असते तसेच १२ गाड्या ओढल्या जातात. या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असते. सदर याठिकाणी सभामंडप नसल्याने, भाविकांची राहण्याची वेवस्था नव्हती.भूमिपूजन प्रसंगी आ. चंद्रकांत पाटील. तसेच मान्यवर व भक्तगण उपस्थित होते.