सावद्यात जागतिक आदिवासी क्रांती दिवस साजरा
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
सावदा,मंडे टू मंडे वृत्तसेवा- सावदा येथे जमादार वाड्यात आदिवासी मंगल कार्यालय मध्ये आज ९ ऑगस्ट रोजी आदिवासी क्रांती दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित सर्व मान्यवरांनी दीप प्रज्वलन केले. व सामूहिक रित्या क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण केली.
याप्रसंगी आदिवासी दिवस ९ ऑगस्टला का साजरा करण्यात येतो. एका आदिवासी कुटुंब मध्ये जन्म झालेल्या क्रांतिवीर बिरसा मुंडा हे क्रांतिवीर म्हणून जगप्रसिद्ध कसे झाले. क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या जन्मापासून ते देशासाठी त्यावेळच्या ब्रिटिश सरकार विरुद्ध पेटून उठून संघर्ष करण्यामागचे त्यांचे ध्याय धोरण जिद्द देश प्रेम देशातील जंगल रक्षण सह त्यांचा बलिदान विषय क्रांतिवीर बिरसा मुंडा यांनी रचलेला इतिहासा पासून आज आदिवासी बांधवांनी बोध घेऊन आजच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या काळात शिक्षणाकडे वळावे जीवनात व समाजहित जनहित अन्याय अत्याचाराविरुद्ध संघर्ष करण्याकामी थेट शिक्षण शिवाय दुसरे कोणतेच हत्यार योग्य व उपयोगी नाही क्रांती वीर बिरसा मुंडा यांनी सुद्धा त्यांच्या जीवनात शिक्षणाला प्रथम स्थान दिले म्हणून आज आदिवासी बांधवांनी सुद्धा शिक्षण हा त्यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू बनवून पुढील वाटचाल करावी.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे,
सावदा पालिकेचे मुख्याधिकारी सौरभ द जोशी,
राष्ट्रवादीचे विरोधी गटनेते नगरसेवक फिरोज खान पठाण, एपीआय देविदास इंगोले,अ.भा. राज्य उर्दू शिक्षक संघटनेचे अध्यक्ष हनिफ सर, नगरसेविका नंदाताई लोखंडे, आसेम संघटनेचे राजू तडवी, मुबारक तडवी सरपंच मोठा वाघोदा, शिवसेना शहर प्रमुख सुरज परदेशी, या मान्यवरांनी आपले मनोगत मनोगत व्यक्त केले. यावेळी तडवी प्रकाश गुरुजी, बेटी बचाव बेटी पढाव संयोजक सारिका चव्हाण, पोलीस टाईम न्युज चे प्रतिनिधी फरीद शेख, वेब असोशियनचे तालुका उपाध्यक्ष युसूफ शाह, मंडे टू मंडे चे संपादक व माजी नगरसेवक भानुदास भारंबे, पत्रकार कैलास लंवगळे ,नगरसेवक कुर्बान मेंबर फैजपुर,समशेर पठाण, रावेर तहसील कार्यालय लिपिक अकबर तडवी, तलाठी सुरेश बोरनारे,शहीद अब्दुल हमीद संस्थेचे अध्यक्ष शेख मुख्तार सचिव फिरोज खान, शिवसेना शाखाप्रमुख इरफान मिया, सावदा मंडळ अधिकारी प्रदीप जयस्वाल, संजू मिस्तरी, हुसैन खान चायवाले, तडवी गनी सर, तडवी हैदर गुरुजी, कोतवाल पिंटू तडवी, अल्ताफ समशेर तडवी, मनोज लालखा तडवी उर्फ मायकल, इत्यादी मान्यवरांनी उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी क्रांतिवीर बिरसा मुंडा यांची प्रतिमा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सौरभ द जोशी यांना पालिकेत लावण्यासाठी भेट स्वरूपी दिली. यावेळी सूत्रसंचालन ईल्यास सर कुरैशी यांनी केले. सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी जमादार वाडा तडवी आदिवासी बांधवांनी परिश्रम घेतले होते.