बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर सुरू असलेल्या आमोदा- भिकनगांव या नविन रोडला तडा
Monday To Monday NewsNetwork।
सावदा ता.रावेर (प्रतिनिधी)। रावेर तालुक्यातील सावदा शहराच्या बस स्थानक च्या काही अंतरावर बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर सुरू असलेल्या आमोदा-भिकनगांव रस्त्याचे काम सध्या सुरू असून नविन तयार केलेल्या रोडला अवघ्या काही दिवसांतच तळा गेल्याने सदर रोडाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने नागरीकांमध्ये संताप व्यक्त केल्या जात आहे.
तसेच एकी कडे सरकार सर्वच ठिकाणी रस्ते,माहा मार्ग चांगले दर्जेदार उत्कृष्ट व लॉंग लाइफ टिकावे या हेतूने अमाप पैसा खर्च करून नविन व आधुनिक पद्धतीचे रोड,महामार्ग तयार करीत असून सदर रोड निकृष्ट दर्जाचे होत असून सावदा बस स्थानकाच्या काही अंतरावर सिमेंट काँक्रेट चा तयार करण्यात आलेल्या नवीन रोडला तळा गेलेल्या असून बसस्थानका समोरील पोलीस चौकी समोर मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचत असून याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे तरी या भोंगळ कारभाराला ठेकेदाराची कुच कामी भुमिकाच कारणीभूत नाही का ? हा रोड किती दिवस टिकेल या बाबत शंका व्यक्त केली जात आहे,या कडे कोण लक्ष देतेय ? तसेच सदरील रोडचे निकृष्ट पणे झालेल्या कामाची चैकाशी होणे गरजेचे आहे.