सावदा येथील ” ते ” मिठाईचे दुकान अखेर नगरपालिकेने केले सील
Monday To Monday NewsNetwork।
सावदा (प्रतिनिधी)। राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात ३१ मे पर्यंत लॉकडाऊन चा कठोर निर्बंधाचा निर्णय घेण्यात आला,यात दुकानांना सकाळी ७ ते ११ वाजेच्या वेळ दिला असताना सावदा येथील बसस्थानका वर असलेले श्री शिव राजस्थान मिठाईवाले हे मिठाईचे दुकान लॉकडाउन सुरु असताना देखील दि.१४ रोजी संध्याकाळी ७ वाजून ५ मिनिट पर्यंत सुरु होते. याबाबत सोशल मिडियावर सदर दुकान संध्याकाळी ७ वाजून ५ मिनिटा पर्यंत उघडे ठेवून गिर्हाईकांची गर्दी करीत असल्याचा फोटो प्रसिद्ध झाला .यानंतर यादुकांनावर काय कार्यवाही होते याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.
दरम्यान दुसऱ्या दिवशी १५ तारखेला पुन्हा ५ वाजे दरम्यान हे मिठाई दुकान उघडे होते याबाबत सावदा नगर पालिकेचे कार्यालय अधीक्षक सचिन चोलके यांनी या ठिकानी जाऊन सदर दुकान सील करण्याची कार्यवाही केली यावेळी कार्यालय अधीक्षक सचिन चोलके, किरण चौधरी, भागवत घोघले, यांचे सह कर्मचारी यांनी ही कार्यवाही केली.
बस स्थानकावर पोलीस चौकीच्या मागे असलेले हे मिठाईचे दुकान बऱ्याच वेळा शासनाने दिलेल्या वेळे पेक्षा इतर वेळेला संध्याकाळी सुरुच ठेवत होते, याचे कडे अन्न औषध प्रशासनाचा अधिकृत परवाना आहे काय? एकाच लायसन वरती किती दुकाने चालविली जातात या बद्दल चौकशी होणे गरजेचे आहे.