फैजपूर येथील आठवडे बाजारातील निकृष्ट काँक्रीटीकरण खोदले पण ९०टक्के झालेल्या कामाचे काय?
Monday To Monday NewsNetwork।
फैजपूर/सावदा(प्रतिनिधी)।फैजपूर येथील आठवडे बाजारातील मौलाना अबुल कलाम आझाद आवारात काँक्रिटीकरण सुरू होते सदर काँक्रिटीकरण निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी आल्याने केलेले काम पुन्हा खोदण्यास लावले गेले परन्तु फक्त काही भागच खोदण्यास सांगितले परंतु ९५ टक्के झालेल्या निकृष्ट कामाचे काय? असा प्रश्न उपस्थित झालेला आहे.
गेल्या एक ते दीड महिन्यांपासून आठवडेबाजारातील मौलाना अबुल कलाम आझाद शॉपिंग कॉम्प्लेक्स आवारात काँक्रिटीकरण व नाला दुरूस्ती चे काम एका ठेकेदाराला दिले गेले परंतु एक ते दीड महिन्यांपासून काँक्रिटीकरण सुरू झाले तेव्हापासून येथील नगरपरिषदेचे इंजिनीयर हे कामाच्या ठिकाणी हजर असतात नगरपालिकेचा इंजिनिअर हजर असताना सुदधा ठेकेदाराचा मनमानी कारभार सुरूच असल्याचे निदर्शनात येते , ठेकेदार हा मनमानी कारभार करत असून आणि माती मिश्रीत रेतीचा यामध्ये सर्रास वापर करीत आहे ,नगरपरिषदेचे इंजिनीयर यांनी आज ठेकेदाराला झालेले काँक्रिटीकरण खोदून लावण्यास सांगितले,जवळजवळ पंचवीस ते तीस फूट एवढा काँक्रीटीकरण नगरपरिषदचे इंजिनिअर यांनी खोदण्यास भाग पाडले परंतु ९० टक्के झालेल्या काँक्रीटीकरणाचे काय? असा प्रश्न उपस्थित केलां जात आहे,या काँक्रीटीकरणामध्ये माती मिश्रित रेती सह सिमेंट सुद्धा हलक्या दर्जाचे वापरण्यात येत आहे
काँक्रिटीकरण सुरू असताना पालिकेकडून उत्तम दर्जाचे काम पाहिजे असे सांगितले आणि ही रेती चालणार नाही, असे सांगितले तरीसुद्धा ठेकेदाराचा मनमानी कारभार सुरू असून काम पुन्हा सुरू करण्यात आले,केवळ दहा टक्के काम राहिलेले असताना पालिकेचे इंजिनिअर म्हणतात काँक्रीटीकरण उत्तम दर्जाचे पाहिजे परंतु ९० टक्के झालेल्या कामाचे काय ?असा प्रश्न सुज्ञ नागरिकांमध्ये उपस्थित झाला आहे ,या कामांची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली असून पहिल्याच पावसात झालेले काम पाण्यात जाणार् असल्याचे चित्र आहे