भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

नगरपालिकारावेरसामाजिक

दिव्यांग बांधवाना त्यांचे टक्के वारी नुसार आर्थिक मदत; सावदा पालिकेत ठराव

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

सावदा (प्रतिनिधी) – सावदा पालिकेची सर्वसाधारण सभा दी 21 रोजी ऑनलाइन पद्धतीने संपन्न झाली अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ अनिता येवले या होत्या, सभेस नगरसेवक, नगरसेविका तथा मुख्याधिकारी सौरभ जोशी उपस्थितीत होते

सभेत शहरातील दिव्यांग बांधवाना 5% निधि वाटप बाबत मंजूरी मिळाली यामुळे शहरातील सुमारे 197 दिव्यांग बंधवाना त्यांचे टक्के वारीनुसार आर्थिक मदत वाटप करण्यात येईल, ओम कॉलनी मधील पालिकेच्या ओपनस्पेसवर क्लब हॉलचे बांधकाम करणे, जलकुंभ बांधकामा साठी माहाराष्ट्र जीवन प्राधिकरणास ना हरकत देणे, थोरगव्हाण रस्त्यावर गटारी बांधणे, पालिका ईमारतीवर रेनवॉटर हार्वेस्टिंग करणे यासह बाकी विषयाना मात्र सभेत मंजूरी देण्यात आली, सभेसमोर ऐकून 16 विषय मांडण्यात आले होते,

यापैकी विषय क्रमांक 5 घनकचरा प्रकल्पास संरक्षक भीत उभारणे तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर संकुलाचे फेस टू मधील वरील मजल्याचे बांधकाम करणे या दोन विषयावर चर्चा सुरु असताना नगरसेवक राजेश वानखेडे यांनी सदर दोन्हीं विषया बाबतीत सदर कामाचे अगोदर इस्टिमेट तयार करा ते सभेसमोर मांडा मगच त्यास परवानगी दया असे म्हणणे मांडले आमचा विकास कामाना विरोध नाही तथापि सदर विषया बाबतीत सभे समोर अगोदर इस्टिमेट सह विषय ठेवा अशी मागणी केल्याने सदर विषय या सभे साठी तहकूब ठेवण्यात आले, आता हे दोन्ही विषय पुढील सभेत इस्टिमेट सह पुन्हा ठेवण्यात येतील,

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!