गारबर्डी धरणावर पर्यटकांकडून जबरजस्ती वसूली;धरणाची सुरक्षा वाऱ्यावर
Monday To Monday NewsNetwork।
सावदा ता.रावेर (प्रतिनिधी)। जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सातपुड्याच्या परिसरातील पाल पासून जवळपास ५ की.मी. अंतरावर असलेल्या गारबर्डी धरणावर पावसाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असते परंतु गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारी मुळे पर्यटन बंद आहे.मात्र तरीदेखील धरणावर फिरायला जाणाऱ्या पर्यटकांकडून जबरदस्तीने धमकावून थेट पैसे वसूली केली जात असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.
आर्थिक वसुली करणारे सातपुड्यातील स्थानिक रहिवासी असल्याचे समजते.या बेकायदेशीर व जबरदस्तीने होणारी आर्थिक वसुलीने पर्यटक धास्तावले आहेत.गारबरडी धरण सातपुड्यातील संपूर्ण परिसर हा निसर्गरम्य असल्याने जिल्ह्याभरातून पावसाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे भेट देत असतात सदरील पर्यटकांना मानसिक त्रास देत गुंड प्रवृत्तीच्या ३ ते ४ तरुणांनी सामूहिक रित्या पर्यटकांची अवैध वसुली सुरू केली आहे.सबब पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. सदरील तरुण वाहन पार्किंगच्या नावाखाली ५० रुपये,तर धरणावर फिरायला जाणाऱ्या प्रतिपर्यटक पासून १० रूपये अशी वसुली करीत आहेत.
पैसे देण्याचे कोणी नाकारल्यास तुच्या वाहनाच्या टायर पंक्चर झाला,काच्या फुटले,तर आम्हाला बोलायचे नाही असे धमकी वजा उत्तर देतात म्हणून पर्यटकांना नाईलाजाने यांना पैसे द्यावे लागतात.स्थानिकांपासून होत असलेली वसूल त्वरित थांबवावी अशी मागणी पर्यटकांकडून करण्यात येत आहे.
धरणाची सुरक्षा वाऱ्यावर
याबाबत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्रकारांने विचारल्यास माहिती घेऊन सांगतो अशी उत्तरे दिली जातात. अनेक अधिकारी या धरणापासून अनभिज्ञ आहे म्हणून सदर धरणाची सुरक्षा वाऱ्यावर दिसून येते असे म्हटले तरी यात गैर वाटण्यासारखे काहीच नाही