भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यरावेर

सावदा येथे कुसुम बहुद्देशीय संस्थे तर्फे मोफत माक्स वाटप

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

सावदा,मंडे टू मंडे वृत्तसेवा। सावदा येथील कुसुम बहुद्देशीय संस्था, सावदा, मानिनी फौन्डेशन तसेच आराध्य सपोर्ट यांच्या संयुक्तविद्यमाने आज सावदा येथील लसीकरण केंद्रावर जाऊन तसेच ग्रामीण रुग्णालयात जाऊन मोफत मास्क वाटण्यात आले.
कोरोना व्हायरस टाळण्यासाठी आणि व्हायरसपासून सुरक्षित राहण्यासाठी फेसमास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला. मास्क न वापरणाऱ्या लोकांना अनेक ठिकाणी दंड सुद्धा भरावा लागला असल्याच्याही बातम्या आपण वाचल्या असतील. मास्कमुळे कोरोनाच्या प्रसारावर काही प्रमाणात नियंत्रण येत असल्याचं आढळलंय. म्हणूनच मास्क लावाल, तर वाचाल’, अशी जाहिरातही आता सरकारकडून केली गेली. कोरोनाच्या दुस-या लाटेत अनेकांना जीव गमवावा लागला, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी जरी होत असला तरी कोरोना’ची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे असे असताना देखील बरेच नागरिकांनी मास्क घालणे बंद केल्याचे दिसून येते. कोरोन ची तिसरी लाट येऊ नये ती येण्याआधीच आपण कोरोनशी लढण्यासाठी सज्ज असले पाहिजे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सावदा येथील कुसुम बहुद्देशीय संस्था सावदा, व पुणे येथील मानिनी फौन्डेशन तसेच आराध्य सपोर्ट यांच्या वतीने आज सावदा येथे लसीकेंद्रावर जाऊन महिलाना व पुरुषांना मोफत मास्क वाटण्यात आले.

तसेच सावदा येतील ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन तेथील पेशंटला व सर्व कर्मचारी वर्गाला देखील मास्क वाटण्यात आले. मास्क वाटण्याचा हा उपक्रम पुढेही असाच सुरु ठेवून शक्य होल तितके दवाखाने तसेच शक्य होईल तेवढ्या लसीकेंद्रांवर, मास्क वाटप करणार असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा मंजुषा पाटील यांनी सांगितले. यावेळी लसीकरण केंद्रावर ग्रामीण रुग्णालयातील डॉ. निलजा पाटील, डॉ. तायडे, डॉ. दीपिका ओक, सिस्टर सौ हेमलता भंगाळे, सौ. दिपाली कोल्हे, श्रीमती ए. डी. तडवी, अमित प्रदिप बेंडाळे हे उपस्थित होते. कार्यक्रमा दरम्यान संस्थेचे सचिव प्रदीप कुळकर्णी, पदाधिकारी हर्षल सेन्दाने, मनीषा सोनार, अमेय कुळकर्णी आदींनी सहकार्य केले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!