फी मध्ये ५०% सवलत मिळावी अन्यथा उपोषण;डॉ. उल्हास पाटील स्कुलच्या प्राचार्यांना पालकांचे निवेदन
सावदा (प्रतिनिधी)। कोरोना मुळे लाकडाऊन च्या काळात मेंटन्स चा खर्च उदा, इलेक्ट्रिसिटी ,लायब्ररी, ल्याब, कॉम्पुटर, केअर टेकर, आदी, खर्च स्कूल ला लागला नसताना आणि रोज एक ते दोन तास शिकवले जात असताना पूर्ण आठ तासाची फी मागितली जाते.
फी मध्ये पन्नास टक्के सवलत मिळावी या करिता येथील डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल च्या प्राचार्यांना निवेदन देण्या साठी स्कूल च्या आवारात जवळ जवळ दीडशे पालक पुरुष-महिला जमल्या होत्या, हे पालक महिला पुरुष सुमारे तास भर उन्हात उभे होते. त्या वेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, फी भरली नाही म्हणून आंनलाईन वर्ग बंद करण्यात येऊन ज्यांनी फि भरली त्यांचा नवीन ग्रुप तयार करून त्यांना ऑनलाईन वर्गात जोडण्यात येत आहे व फक्त त्यांचीच परीक्षा घेणार, दर वर्षी एक हजार रुपयांची फी मधे वाढ होत असते आशा तक्रारी या वेळी महिला पुरुष पालकांनी केल्या किरोनाची परिस्थिती असल्याने शेतकरी व मजूर वर्ग, नोकरदार गेल्या सहा महिन्यांपासून घरीच आहे, पालकांनी दिलेल्या निवेदनाच्या विचार न केल्यास उपोषणाचा इशारा सुद्धा पालकांनी दिला आहे .