सावदा येथून निघणाऱ्या १००० व्या किसान रेलला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
सावदा,ता.रावेर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। माननीय प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचा शेती माल देशातील इतर राज्यात विक्री साठी सुरू करण्यात आलेली “किसान रेल” ची सुरवात सावदा रेल्वे स्टेशन वरूनच या पूर्वी करण्यात आली होती . सदर सेंट्रल रेल्वेच्या १००० व्या किसान रेलला सावदा स्टेशन ते आदर्श नगर, नवी दिल्ली या ट्रेनला कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर, रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व खासदार रक्षाताई खडसे यांनी दिल्ली येथुन व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले.
या सदर सेंट्रल रेल्वेच्या १००० व्या किसान रेलला सावदा स्टेशन ते आदर्श नगर, नवी दिल्ली या ट्रेनला २३ डबे होते त्यात ४५३ टन केळीची वाहतूक करण्यात आली,आता पर्यंत ३.४५ लाख शेत मालाची वाहतूक या किसन रेल्वे मध्ये माध्यरेल्वे कडून करण्यात आली आहे. सदर किसान रेल द्वारे शेतकऱ्याच्या शेतातील मालाला थेट व्यापाऱ्यांना विक्री करून पाठविण्यात येत असुन त्यामुळे शेतकऱ्यांना व्यापक बाजारपेठ मिळण्यासोबत, त्यांच्या मालाला चांगला भाव मिळून त्यांचा फायदा होत आहे, सदर योजना शेतकऱ्यांच्या हिताची असून याद्वारे मोदी सरकारची शेतकऱ्यानं प्रती असलेल्या कळवळी दर्शविणारी आहे.
सदर कार्यक्रमाचे मध्य रेल्वे तर्फे सावदा रेल्वे स्टेशन येथे आयोजन करण्यात आले होते, यावेळी सदर कार्यक्रमास मुक्ताईनगरचे आ.चंद्रकांत पाटील, आ.शिरीष चौधरी डॉ राजेंद्र फडके, उत्तर महाराष्ट्र किसान सेल प्रमुख सुरेश धनके, नंदू महाजन, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, भाजप तालुका अध्यक्ष राजन लासुरकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, सावदा शहराध्यक्ष जे. के. भारंबे, सारिका चव्हाण, रावेर युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष प्रतिक भारंबे, वासू नरवाडे, महेश चौधरी रावेर यावल तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व केळी उत्पादक शेतकरी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.