भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरशैक्षणिक

इत्तेहाद एज्युकेशन सोसायटी सावदा तर्फे शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

सावदा,ता.रावेर.मंडे टू मंडे वृत्तसेवा।
सावदा येथील इत्तेहाद एज्युकेशन सोसायटी सावदा द्वारा संचालित क़ारी गुलाम मुस्तफा अंग्लो उर्दू हायस्कूल सावदा येथील कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 5 सप्टेंबर शिक्षक दिन निमित्ताने संस्थेने आपल्या शाळेतील कार्यरत कर्मचाऱ्यांना या वर्षा पासून आदर्श शिक्षक व आदर्श कर्मचारी पुरस्कार देण्याची सुरुवात केली आहे.

दिनांक 5 सप्टेंबर 2021 रविवार रोजी हे पुरस्कार संस्था द्वारा देण्यात आले.
1) इरफान खान जमशेर खान
ज्येष्ठ शिक्षक,
2)शेख अरशद हुसैन शेख सईद
विना अनुदानित शिक्षक,
3)असगर खान अमानुल्ला खान
शिक्षकेतर कर्मचारी
4शेख दानिश शेख सगीर बागवान,उत्कृष्ट प्रभारी मुख्याध्यापक यांना या वर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आज क़ारी गुलाम मुस्तफा अंग्लो उर्दू हायस्कूल सावदा येथील कार्यक्रमात संस्था अध्यक्ष अकबर खान सचिव शेख सुपडू उपाध्यक्ष रफिक शेख संचालक व शाळा समिती चेअरमन शेख इक्बाल व व्हा चेअरमन अकरम खान, संचालक शेख हनीफ सर
यांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्राफी‌ देऊन सन्माननीत करण्यात आले.


कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी संस्था उपाध्यक्ष शेख रफीक शेख गुलाब हे होते. कार्यक्रमात शिक्षक दिना निमित्त संस्था संचालक तथा उर्दू शिक्षक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शेख हनीफ सर यांनी मनोगत व्यक्त करतांना शिक्षक हेच खरे राष्ट्र निर्माता असुन आपल्या वर राष्ट्र घडविण्याची क्षमता असुन आपली जुम्मेदारी आहे .नंतर चेअरमन इक्बाल शेख कादर यांनी व पुरस्कारार्थी शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले
सुत्रसंचलन अजमल सर तर आभार प्रदर्शन अय्युब खान सर यांनी केले,कार्यक्रमाचे प्रास्ताविक हाजी कुतबुद्दीन सर यांनी केले
कार्यक्रमात मुख्याध्यापक दानिश सर इरफान खान सर, जाकिर सर ,‌युनुस सर, शकिल सर, ज़ुबेर खान सर,जहाँगीर सर, सईद सर, अजमल सर, अर्शद सर, मुदस्सर सर, फिरोज सर, जब्बार सर, सलीम सर, खिजर सर, असगर खान दादा, सलीम खान, सईद शेख रफीक, असे प्रसिद्धीस अकरम खान यांनी दिले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!