सावदा शहरातील चौफुली व मुख्य रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावा – जिल्हा संयोजक सारिका चव्हाण
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
सावदा,मंडे टू मंडे वृत्तसेवा। सावदा शहरातील चौफुली व मुख्य रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावावे, अशी मागणी बेटी बचाओ बेटी पढाओ जळगाव जिल्हा संयोजक सारीका चव्हाण यांच्यातर्फे नगरपालिक मुख्याधिकारी यांना आज देण्यात आले .
मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,सावदा शहर ३८ गावांची मुख्य बाजारपेठ आहे. येथे मोठा आठवडे बाजार, गुरांचा बाजार व केळीची मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात व्यवसायिक व खेरीददार येत असतात, त्यामुळे शहर गजबजलेले असते. त्यामुळे अपप्रवृत्तीचे लोक छोटे-मोठे गुन्हेगार यांच्या सतत वावर असतो. अशा लोकांवर व शहराचा रक्षणासाठी प्रशासनातर्फे काहीतरी वचक हवा म्हणून नगरपालिका व प्रशासनाच्या व व्यवसायिक आस्थापनाच्या माध्यमातून सावदा शहरातील चौफुली व मुख्य रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून दयावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदन देतांना, बेटी बचाओ बेटी पढाओ जळगाव जिल्हा संयोजक सारीका चव्हाण,मा. नगराध्यक्ष व नगरसेवक राजेंद्र चौधरी, मियांवाकी प्रकल्पाचे ऋशीकेश पाटील, सर्वेश लोमटे, भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस सागर चौधरी, नाजिम शेख उपस्थित होते.