खान्देश सुपुत्र देशात सातवा; सावद्यातील चि. सोहम चे राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत यश
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई (प्रतिनिधी)। देशभरातील नागरिकांसाठी कोव्हिडमुक्त भारत या विषयावर खुली ऑनलाईन कोविड फ्री इंडिया या राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . यात सावदा ,ता,रावेर, जिल्हा-जळगाव येथील मूळ रहिवाशी ,चि.सोहम दीपक पाटील,इयत्ता-आठवी,उल्हास विद्यालय,उल्हासनगर-४ याने संपूर्ण देशात सातवा क्रमांक मिळवला आहे,
नवी दिल्ली येथील कॉन्फेडरेशन ऑफ युनेस्को क्लब्ज अँन्ड असोसिएशन ऑफ इंडिया (सीयुसीएआय) तर्फे व युनेस्को क्लब महाराष्ट्र यांच्या वतीने . 5 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर 2020 या कालावधीत ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली . स्पर्धेमध्ये देशभरातून पाच हजार हुन अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेसाठी इनर व्हील क्लब ऑफ बॉम्बे बे व्ह्यू बक्षीस प्रायोजक होते.
पारितोषिक मध्ये टॉप 10 विजेते निवडण्यात आले,
प्रथम 3500₹, प्रमाणपत्र व ट्रॉफी द्वितीय 2500 ₹, प्रमाणपत्र व ट्रॉफी, तृतीय 1500 ₹, प्रमाणपत्र व ट्रॉफी, विजेते क्रमांक, चार ते दहा प्रत्येकास *500₹ आणि प्रमाणपत्र देण्यात आले, सर्वोत्तम 150 चित्रांना उत्तेजनार्थ प्रमाणपत्र देण्यात आले.
मूळ रहिवाशी ,सावदा, ता.रावेर,जिल्हा-जळगाव.येथील दीपक मोतीराम पाटील , हल्ली मुक्काम -उल्हासनगर यांचा मुलगा चि,सोहम दीपक पाटील हा उल्हासनगर येथील उल्हास विद्यालयात इयत्ता आठवी मध्ये शिकत असून याने या राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत सहभाग घेतला होता, त्याने या स्पर्धेत देशात सातवा क्रमांक मिळवल्याने त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे,