भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्ररावेर

रब्बी हंगामातील ” ई पिक ” पाहणीसाठी १५ मार्च पर्यंत मुदतवाढ

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

सावदा /खिर्डी ता.रावेर, मंडे टू मंडे वृत्तसेव : ई -पीक पाहणी मोबाईल ॲपच्या साहाय्याने सर्व खातेदार शेतकरी तलाठ्याकडे न जाता आपल्या स्वतःच्या मोबाईल वरून आपल्या ७/१२ वर विविध पिकांची नोंदणी करता येणे शक्य झाले आहे. महसूल विभागाचा ई पीक नोंदणी प्रकल्प हा १५ ऑगस्ट २०२१ पासून महाराष्ट्रात राज्यभर राबविण्यात येत आहे. या ॲप द्वारे आता पर्यंत सुमारे १ कोटी पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी ई – पिक पाहणी ॲप द्वारे आपल्या पिकांची नोंदणी केली आहे.

सध्या रब्बी हंगामाच्या पीक पाहणीची कार्यवाही सुरु आहे. रब्बी हंगामाच्या पीक पाहणीच्या नोंदी साठी ई – पीक पाहणी चे 1.0.0.7 हे अपडेटेड व्हर्जन गूगल प्ले स्टोअर वर उपलब्ध करून दिले आहे. तरी सर्व खातेदार शेतकरी यांनी नवीन व्हर्जन अपडेट करून घेणे आवश्यक आहे. रब्बी हंगामाच्या प्रत्यक्ष ई – पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणी करण्यासाठी २८ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

परंतु राज्याच्या काही भागात कोरोना महामारी व उशिराच्या मान्सूनमुळे शेतकर्याना आपली पीक पाहणी पूर्ण करता आली नाही , याचा विचार करून मा. जमाबंदी आयुक्त यांचे मान्यतेने ई – पीक पाहणी मोबाईल ॲप द्वारे शेतकरी स्तरावरील पीक पाहणीची मुदत १५ मार्च २०२२ पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तरी सर्व शेतकरी बंधूना आवाहन करण्यात येते की, त्यांनी रब्बी हंगाम २०२२ ची पीक पाहणी वाढीव मुदतीत म्हणजेच दिनांक १५ मार्च २०२२ पर्यंत ई पीक पाहणी ॲपद्वारे पीक पाहणीची नोंदणी पूर्ण करावी असे आव्हान करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!