ओरीजनल पत्रकार संघातर्फे कवयत्री शांता शेळके यांच्या जीवनावर प्रा.नितीन मटकरी यांचे व्याख्यान
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
प्रदीर्घ कालखंडानंतर मला माझ्या गावाने प्रमुख व्याख्यात्याचा सन्मान दिला. ही माझ्या आजवरच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय अनुभव देणारी घटना– प्रा.नितीन मटकरी
सावदा,ता.रावेर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। सावदा येथील ओरीजनल पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनानिमित्त कवयत्री शांता शेळके यांच्या जीवनावर व्याख्यान तसेच कोरोना योद्धाचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रजापिता ब्रह्मकुमारी प्रमुख वैशाली दीदी,प्रमुख पाहुणे उपविभागीय अधिकारी कैलास कडलक, सावदा पोलिस स्टेशनचे ए.पी.आय. देविदास इंगोले,जळगाव येथील प्राध्यापक नितीन मटकरी, आ.चंद्रकांत पाटील यांचे प्रतिनिधी म्हणून तुषार भाऊ बोरसे हे होते. कार्यक्रमाच्या सुरवातीस दीपप्रज्वलन करून कवयत्री शांता शेळके व बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण केला. त्यानंतर ओरीजनल पत्रकार संघातर्फे कोरोना काळात ज्यांनी मोलाचे कार्य केले त्यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला ,यात हाजी शब्बीर हुसैन अख्तर हुसैन बौहरी ऊर्फ बाबूशेठ, डॉ. हाजी हारुन शेख, नगरसेवक फिरोज खान, बेटी बचाव बेटी पढाव जिल्हा संयोजिका सारिका चव्हाण, डॉ. अन्सार खान गुलाम गौस खान, ज्येष्ठ पत्रकार भानुदास भारंबे, दिवक श्रावगे, यांना शाल श्रीफळ तसेच प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यात एकूण १० कोरोना योद्धा चा सत्कार करण्यात आला. सत्कार उपविभागीय अधिकारी कैलास कडलक, ए.पी.आय. देविदास इंगोले, वैशाली दीदी यांच्या हस्ते करण्यात आला.
प्राध्यापक नितीन मटकरी यांनी कवयत्री शांता शेळके यांच्या जीवनावर व्याख्यान दिले, मटकरी म्हणाले कि, ६ जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. माझी जन्मभूमी व जेथे मी शिक्षणा सोबतच जिवनाचे प्राथमीक धडे गिरवले. त्या सावदा गावात आज प्रमुख व्याख्याता म्हणून जातांना मला मनस्वी आनंद वाटला. आज २७ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर मला माझ्या गावाने प्रमुख व्याख्यात्याचा सन्मान दिला. ही माझ्या आजवरच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय अनुभव देणारी घटना आहे.ओरीजनल पत्रकार संघाचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात करोनाकाळातील करोनायोध्द्यांचा गौरव करण्यात आला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मरण करण्यात आले व कवयित्री शांताबाई शेळके यांच्या पत्रकार म्हणून केलेल्या कार्याचा उजाळा घेण्यात आला. आजवर शैक्षणिक व त्या अनुषंगाने इतर संबंधित विषयांवर लेक्चर, प्रेझेंटेशन, देण्यासाठी अनेक ठिकाणी जाण्याचा योग आला पण आज आपल्याच गावात आपल्याच जिवा भावाच्या व्यक्तीं समोर बोलणे हा एक फार मोठा भावनिक प्रसंग ठरला व मन भारावले. प्रेम, परस्परांशी असणार सामंजस्य, एकमेकांविषयीचा आदर या दुर्मिळ होत चाललेल्या गोष्टी माझ्या गावात आजही आहेत या एकाच निरीक्षणाने मन सुखावले. प्रजापिता ब्रम्हकुमारी विद्यालयाच्या आध्यात्मिक सान्निध्यातील प्रत्येक क्षण मनःशांती देणारा ठरला आमच्या गावातील शाळा, विद्यालय यांनी शैक्षणिक गुणवत्ता जोपासली पण सामान्य विद्यार्थ्यांना जिवनातील संघर्षात यशस्वी कसे व्हावे याचे धडे दिले. हे विशेष म्हणून आम्ही आज येथवर पोहोचलो. पंखात बळ आल्यावर प्रत्येक पाखराने आभाळात भरारी घ्यावी पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली ते घरटे कधी विसरू नये काहीशी अशीच भावनिक अवस्था अनुभवास आली यासाठी सर्व आयोजकांचा फार मोठा सहभाग व वाटा आहे. त्यांचे ॠण न फिटणारेच आहे. पण या ॠणातून उतराई होण्याचा प्रयत्न मी जरूर करेन. जेणेकरून माझ्या सारखे सामान्य घडतील व घडवतील.
या वेळी उपविभागीय अधिकारी कैलास कडलक याच्या तर्फे कोरोना काळात कोरोनाने निधन झालेल्यांच्या प्रेतास अग्नीडाग देण्या वेळचा विधी करणाऱ्या व विनामूल्य कबर खोदनरे आशा चौघांना प्रत्येकी रु.पाचशे असे बक्षीस देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन सकळकळे सर व फरीद शेख यांनी केले. कार्यक्रमाच्या वेळी ओरिजिनल पत्रकार संघ सावदा चे अध्यक्ष युसूफ शाह, उपाध्यक्ष कैलास लवंगडे, जेस्ट सदस्य भानुदास भारंबे,सदस्य प्रदीप कुलकर्णी, दिलीप चांदेलकर, दीपक श्रावगे, सचिन सकळकळे सर, फरीद शेख, तसेच नगरसेवक राजेंद्र चौधरी, पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड, राजेंद्र पवार,लेखक अनिल कानडे, शिवसेनेचे शहर प्रमुख सुरज परदेशी, शरद भारंबे, दुर्गा केबलचे संचालक किशोर परदेशी, क्रिस्टल कॉम्पुटर चे संचालक राजेश चौधरी, अजमल खासाब, गजू ठोसरे, सुनील चोपडे, शिवसेना शाखाप्रमुख इरफान मिया इत्यादी मान्यवर उपस्थित होते.