सावदा येथील खंडेराव मंदिरात खंडेराव – म्हाळसा यांचा विवाह सोहळा संपन्न
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
सावदा,ता.रावेर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। हिंदू संस्कृतीचा एक भाग म्हणून परंपरागत चालत आलेला रूढी प्रमाणे पौष पोर्णीमे निमित्त सावदा येथील खंङेराव मंदिरात खंडेराव व म्हाळसा आई यांचा विवाह सोहळा पार पङला.
विवाह सोहळा संतोष महाराज शास्त्री यांनी मंत्र पठण करून विवाह विधी पूर्ण केला , वर पक्षाच्या वतीने अंतरपाठ धरण्याचा मान नोमदास भंगाळे यांना तर वधू पक्षाच्या वतीने प्रशांत महाजन (स्वेद बिंदूचे मालक) यांना मिळाला सदरील सोहळा हा कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता शासकीय नियम पाळून छोटे खानी कमीत कमी लोकात हा विवाह सोहळा कार्यक्रम पार पङला परंतू पुढील वर्षी हा सोहळा मोठ्या प्रमाणात पार पङणार असल्याचे मंदिराचे पुजारी राहूल महाराज यांनी सांगीतले या सोहळ्याला अशोक महाराज,रामदास नेमाङे,अक्षय, विश्वनाथ वाघुळदे, भुसावल शिवसेना महीला जिल्हाप्रमुख पुनम ब-हाटे ,माधुरी पवार,हेमांगी चौधरी मा.नगराध्यक्षा, सौ सरोदे ताई,राहूल महाराज,ईश्वर नेमाङे,राजेंद्र चौधरी मा.नगराध्यक्ष, नंदू तांबटकर अक्षय भंगाळे व नागरिक उपस्थित होते