भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यक्राईमरावेर

विनामास्क फिरणाऱ्या १०४ जणावर सावद्यात कार्यवाही,२२,८०० रुपये दंड वसुल

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

सावदा (प्रतिनिधी)। सध्या राज्या सह जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता प्रशासन दक्ष असून जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशानुसार सावदा नगरपरिषद व पोलिस प्रशासन यांच्या तर्फे दिनांक २१-०२-२०२० रोजी सकाळी ९:३० ते दुपारी १ पर्यंत विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर संयुक्त कारवाई करण्यात आली
यावेळी शहरातील आठवडे बाजार परिसर, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर येथे मास्क न लावलेल्या केलेल्या एकूण १०४ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून एकूण रू २२ हजार ८०० रू दंड करण्यात आला आहे

अशी कारवाई शहराच्या निरोगी भवितव्यासाठी पुढील काळात ही सुरू राहणार असल्याचे मुख्याधिकारी सौरभ जोशी तसेच सावदा पोलीस स्टेशनचे स.पो.नी. देवीदास इंगोले यांनी सांगितले, दरम्यान शहरात कार्यवाही वेळी न.पा. कार्यलय निरक्षक सचिन चोळके, आहूजा साहेब, कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी सहभागी होते, या कार्यवाही मुळे शहरात वीनामास्क फिरणाऱ्यावर वचक बसणार असून नागरिकांनी बाहेर सार्वजनिक जागी मास्क तसेच फिजिकल डिस्टन चे पालन करने आवश्यक असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!