सावद्यातील अवैध २ पैकी फक्त १ झूलेलाल बायोडिझेल पंपावर गुन्हा दाखल : महसूल विभागाची अजब किमया : भूमिका संशयास्पद
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
सावदा, मंडे टू मंडे वृत्तसेवा– परवानगी नसताना बायोडिझेल विक्रीचा गोरख धंदा थाटलेल्या पंपांवर कारवाईची मागणी होत असताना महसूल विभागाने यात अजबच शोध लावला आहे. रावेर तालुक्यातील सावदा येथील अवैधरित्या बायोडिझेल विक्रीचा गोरख धंदा करणारे बायोडिझेल विक्रीचे दोन पंप चालत असताना फक्त एकाच झुलेलाल बायोडिझेल मलाकवर अखेर १५ दिवसानंतर सावदा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र सावदा येथे अवैधरित्या बायोडिझेल दोन पंप चालत असताना फक्त एकाच झुलेलाल बायोडिझेल पंपाचे मालकावरच कारवाई करून गुन्हा दाखल झाल्याने, महसूल विभागाने अजब किमया केली असून रावेर रोडवरील महेंद्र ढाब्याजवळील दुसऱ्या अवैध बायोडिझेल पंप मालकावर महसूल विभाग कडून गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, या दुसऱ्या रावेर रोडवरील पंपावर कोणतीही कारवाई न करण्यामागचे कारण काय? चिरीमिरीचा भाग तर नाही ना असा प्रश्न उपस्थित झाला असून येथील बायोडिझेल विक्रीचा गोरखधंदा प्रकरणी रावेर तहसीलदारांची भूमिका संशयास्पद असून पंधरा दिवस उलटूनही पंप मालकांवर गुन्हा का दाखल केला नाही. गुन्हा दाखल करायला उशीर का? व एकाच पंपचालकावर गुन्हा दाखल करण्यात का आला? यात काय आर्थिक सेटलमेंट आहे का अशी चर्चा परिसरात चर्चिली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एका प्रसिद्ध ट्रान्सपोर्टच्या मागे भाड्याने घेतलेल्या जागेवर अवैधरित्या झुलेलाल बायोडिझेल नावाने व रावेर रोड वरील महिंद्रा ढाब्या जवळ अवैध बायोडीझल पंपावर बिनदिक्कतपणे बायोडिझेल विक्री करण्याचा गोरखधंदा चालविला जात होता. या संदर्भात अनेक तक्रारी झाल्याने बायोडिझेलचा एक पंप सील झाला.व रावेर रोडवरील दुसऱ्या पंपावर संबंधित यंत्रणांकडून कोणतीच कारवाई झालेली नव्हती . या डोळे मिटून दूध पिण्याचा प्रकार चालू होता यामागचे अनेकांचे वर पर्यंत “हात ओले” केले जातात यामुळे महसूल, पुरवठा विभाग व अन्य कोणतीही यंत्रणा यात रस घेत नाही. सावदा येथे एक नव्हे तर दोन अवैध बायोडिझेल पंप असताना मात्र महसूल विभागाची अजब किमिया केली रावेर रोडवरील बायोडिझेल पंप मालकावर अद्याप कोणतीच कारवाई न करता फक्त झुलेलाल बायोडिझेल पंप मालकवर कारवाई केली, फक्त एकाच पंपावर कारवाई केल्याने महसूल विभागाने घेतलेली ही भूमिका संशयास्पद असून कुठं तरी पाणी मुरतय हे नक्की !
परिणामी दिनांक ६ ऑगस्ट २०२१ रोजी महसूल विभागाला उशिरा का होईना जाग आली व सावदा फैजपूर रस्त्यावरील डायमंड ट्रान्सपोर्ट च्या मागे बायोडिझेलच्या नावाने गोरखधंदा करणारे झुलेलाल पंप मालक नीरज खेमचंद जैसवाणी रा. जळगांव यांच्याविरुद्ध अतुल वाकोजी नागरगोजी पुरवठा निरीक्षक तहसीलकार्यालय रावेर यांनी फिर्याद दिल्यानंतर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं.१२०/२०२१ भादवी कलम ४२०,४०६,१८८ व जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. बायोडिझेलची विक्री किती झाली?एकूण साठा किती होता? व त्याचा शिल्लक साठा किती?त्याचे नमुने सॅम्पल तपासणी होणे गरजेचे आहे,
“बायोडीझल “हा नेमका काय प्रकार आहे– हा”महत्वाचे म्हणजे सदर बायोडिझेल हा काय प्रकार आहे , या बाबत अधिक चौकशी केली असता “रॉकेल मध्ये ऑइल मिश्रण करून त्यात इतर केमिकल व तेल मिश्रित करून प्रक्रिया केली जाते त्याला बायोडिझेल म्हणून विक्री केली जाते “असे सांगण्यात आले.
जळगाव जिल्ह्यात रॉकेल बंद असताना हे रॉकेल येते कुठून ? हे बायोडीझल पुरवठा करणारे कोण? व पुरवठा कसा केला जातो ? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत असून याप्रकरणी रावेर ते जळगांव दरम्यान महसूल विभाग व दोन्ही पंप चालक यांच्यामध्ये मोठी आर्थिक देवाण-घेवाण झाली असावी अशी चर्चा नागरिकांमध्ये ऐकायला मिळत आहे .