खिरोदा येथे गावठी कट्टा, जिवंत काडतुसांसह दोन जणांना अटक : आयजी पथकाची कारवाई
सावदा, ता. रावेर, मंडे टू मंडे वृत्तसेवा : येथून जवळच असलेल्या खिरोदा गावांमध्ये बस्थानाकाजवळ गावठी कट्टा आणि जीवंत काडतुसांसह दोन जणांना अटक करत नाशिक आयजी यांचे पथक आणि सावदा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत केल्याने खळबळ उडाली आहे.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष महानिरिक्षकांच्या पथकाला खिरोदा येथे गावठी कट्टा आणि एक जीवंत काडतुस बाळणाऱ्या संदर्भातील गुप्त माहिती मिळाली होती. या अनुषंगाने पथकातील ए. एस. आय. बशीर तडवी व हे कॉ राजेंद्र बोरसे यांनी सावदा पोलीस स्टेशनला याबाबतची माहिती दिली. यानुसार आयजींचे पथक आणि ए. पी. आय. देविदास इंगोले, पी.एस.आय. राजेंद्र पवार व समाधान गायकवाड, पो.हे.कॉ. मनोज हिरोळे, संजय चौधरी यांच्यासह सहकार्यांनी आज दुपारी खिरोदा गावातल्या बसस्थानक परिसरातील एका हॉटेलच्या समोर दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा आणि एक जीवंत काडतुस जप्त करत कारवाई केली आहे.
आय. जी. यांचे पथकासह सावदा पोलीसाचे तर्फे ही संयुक्त कार्यवाही करण्यात आली असून या कारवाईत दोन जणांना अटक करण्यात आली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा याबाबत सावदा पोलीसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.