गोवंश तस्करांकडून पत्रकारांवर जीवघेणा हल्ला !
सावदा, मंडे टू मंडे वृत्तसेवा : येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दर रविवारी मोठ्या प्रमाणावर गुरे ढोरांचा बाजार भरतो याचे निमित्त साधुन कींवा कसे येथील निवडक तस्कर सावदा येथील काही तरूणांना हाताशी धरून थेट परराज्यातून मोठ मोठ्या वाहानाद्वारे गोवंश चोरुन लपून सावदा येथे आणले जातात.यानंतर त्यांना आपल्या स्वतःच्या गोडाऊनला उतरून या गोवंशाची नियोजनबद्ध पद्धतीने तात्काळ लाहान वाहनांच्या मदतीने विल्हेवाट लावली जाते.
या अतिसंवेदनशील व थेट कायदा व सुव्यवस्थेला संकट ठरणारा गोवंश कारभाराची मिळालेल्या माहितीची खात्रीकरून वृत्त संकलनासाठी दि.२८ मार्च रोजी रात्री १० वा. सावदा येथील पत्रकार फरीद शेख व युसूफ शाह हे दोघे गौसिया नगर येथे गेले असता त्यांना गाडीमध्ये अंधारमय वातावरण निर्माण करून बॅटरीच्या साह्याने गोवंश भरत असल्याचे संशय आल्याने गुरांच्या गाडीचे छायाचित्रण करून घरी परतले नंतर दि.२९ मार्च रोजी दुपारी १ वा.नेहमीप्रमाणे दोघे पत्रकार जमादारवाडा येथे वडाच्या झाडाखाली बसून चर्चा करीत होते.
त्यावेळेस मुजफ्फर राजा कुरेशी,शेख साहिल शेख जावेद कुरेशी,अर्शद उर्फ अज्जा इस्राईल कुरैशी व फय्याज शेख जग्गा असे तेथे आले असता त्यांनी आम्हास विचारणा केली की,तुम्ही रात्री आमच्या गुरांच्या गाडीचे फोटो का काढले.असे विचारून थेट अश्लील शिवीगाळ करून त्यांनी पाईपने हिंसक हल्ला करून इतरांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून पत्रकार फरीद शेख यांना इजा पोहचवली यावेळी युसूफ शाह व शेख रउफ शेख नजीर यांनी वेळप्रसंगी बचाव केला.
परिणामी सदर घटनेची फिर्याद शेख फरीद शेख नूरोद्दीन यांनी दिली असता. हिंसक हल्ला करणारे वरील चौघांविरुद्ध सावदा पोलीस स्टेशनात गुरनं.५१/२०२२ भांदवी कलम ३२३,३२४,५०४,३४ प्रमाणे तसेच महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था अधिनियम २०१७ चे कलम ३,४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. पुढील तपास एपीआय देविदास इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पो. कॉ. रुस्तम तडवी हे करीत आहे.