खिरोदा रस्त्यावर दोन आयशरची समोरा-समोर टक्कर : २५ ते ३० जण जखमी
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
सावदा,ता.रावेर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा येथील वऱ्हाड घेऊन जात असलेल्या पांढऱ्या रंगाची आयशर क्र mh-१९, j – ७७३८ ही गाडी मोठा वाघोदा येथून वऱ्हाड घेऊन जात असतांना खिरोदा गावाच्या पुढे १ km अंतरावर समोरून् पाल कडून येणारी लाल रंगाची आयशर क्र mh-१८ aa २०२० यांची समोरा समोर टक्कर होऊन अपघात झाला आहे,या अपघातात दोन्ही चालकासह २५ ते ३० लोक जखमी झाले आहेत.
मिळालेली अधिक माहिती अशी की,खिरोदा पाल रोड वरती भिलट बाबा मंदिर देवस्थान जवळ मोठा अपघात झाला सदर आयशर क्र mh-१९, j – ७७३८ ही गाडी मोठा वाघोदा येथून वऱ्हाड घेऊन चिचाटी येथे तडवी समाजाच्या महिला वायनवर जात असतांना पाल कडून येणारी लाल रंगाची आयशर क्र mh-१८ aa २०२० यांची समोरा समोर टक्कर होऊन मोठा अपघात झाला असून त्यात २५ ते ३० लोक जखमी झाल्याचे वृत्त असून त्यात महिलांचा समावेश आहे,
घटनास्थळी खिरोदा गावातील श्रीहरी गोशाळेचे कार्यकर्ते व तंटामुक्ती अध्यक्ष गोविंदा चौधरी ग्रा पं माजी सदस्य ललित चौधरी व रूपेश पाटील ,सपोनि देविदास इंगोले, उपनिरीक्षक राजेंद्र पवार , पो हे कांन्सटेबल मेहेरबान तडवी यांनी सर्व जखमींना सरकारी दवाखाना खिरोदा येथे प्रथमोपचार करून रूग्णवाहिकीने पुढील औषधोपचार साठी फैजपूर येथील शैलैंद्र खाचणे यांच्या दवाखान्यात हलवण्यात आले.