भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरशैक्षणिक

सावदा क़ारी गुलाम मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कूल मध्ये दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Monday To Monday NewsNetwork।

सावदा.ता.रावेर (प्रतिनिधी)। सावदा येथील इत्तेहाद एज्युकेशन सोसायटी संचालित अँग्लो उर्दू हायस्कूल सावदा या शाळेत सन 2021 मध्ये इयत्ता 10वी SSC बोर्ड परीक्षेत सादिया बी शेख हनीफ 95.20% गुण मिळवून गुणवत्ता यादीत आली आहे.
सावदा येथील सर्व माध्यमिक विद्यालयात शहरात प्रथम आली आहे , द्वितीय क्रमांक शेख इब्राहीम शेख आशिक खाटिक याला 88% तर तृतीय क्रमांक अन्सारी बुशरा आसिफ हिला 86% गुण मिळाले आहे
सादिया बी ही अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य उर्दूसाहित्य अँकॅडमी चे माजीसंचालक मोहंमद हनीफ सर यांची मुलगी आहे

या यशा बद्दल शाळेने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता . कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी संस्था अध्यक्ष अकबर खान हे होते प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे व्हा चेअरमन अकरम खान तसेच गावातील उर्दू माध्यमाच्या शाळेतून शिक्षण घेतलेले नामवंत डॉक्टर नासिर खान, लियाकत कुरेशी,अहमद रज़ा पटवे यांच्या हस्ते प्रमाणपत्र,ट्राफी , व पुस्तके भेट देऊन सत्कार करण्यात आला विशेष पाहुणे म्हणून पत्रकार युसूफ शाह, फरीद शेख, साजिद शेख उपस्थित होते
विद्यार्थ्यांचे सर्वांनी अभिनंदन व पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या,तसेच इत्तेहाद एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अकबर खान यांनी मनोगत व्यक्त केले पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या,तसेच फोन वरून संस्थेचे सचिव शेख सुपडू, उपाध्यक्ष रफिक शेख, शाळा समिती चेअरमन शेख इक्बाल शेख कादर, लुकमान खान यांनी अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अजमल सर यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक दानिश बागवान यांनी केले ,तसेच शिक्षक अय्युब खान, हाजी कुतबूद्दिन शेख सर , इरफान खान सर ,सै ज़ाकिर सर, शकिल खान सर ,जहाँगीर सर,अजमल सर, अर्शद सर, फिरोज सर,ज़ुबेर खान सर, मुदस्सर सर , सलीम अहमद सर, जब्बार सर , खिजर सर,असगर खान,सलीम खान सईद शेख, इत्यादी यांनी परिश्रम घेतले व शुभेच्छा दिल्या

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!