भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरशैक्षणिकसामाजिक

आ.गं. हायस्कूल व ना.गो.पाटील कनिष्ट महाविद्यालया तर्फे हर घर तिरंगा जनजागृती साठी पथनाट्य

सावदा,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा।। आज दी. ११ आगस्ट २०२२ गुरुवार रोजी सावदा येथील श्री आ गं हायस्कूल व श्री ना गो पाटील कनिष्ट विद्यालयातील विद्यार्थ्यांची प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ११ वी व १२ वी च्या विद्यार्थिनीनी हर घर तिरंगा या अभियानाच्या जनजागृती साठी पथ नाट्य सादर केले.

या पथनाट्यची पटकथा व दिग्दर्शन विद्यालयाचे कलाध्यापक श्री नंदु पाटिल यानी केले. या पथनाट्यत एकुण चाळीस विद्यर्थ्यानिनी सहभाग घेतला होता. व N C C cadet यानी यात उत्कृष्ट सहकार्य केले. आपल्या स्वातंत्र्यचे, झेन्द्याचे , शाहिद आनी बलिदान केलेल्या सैनिकांचे महत्व आणि देशप्रेम आणि झेंडा फड़कावताना काय काय काळजी घेतली पाहिजे याचा अंतर्भाव या नाटिकेत होता. विद्यार्थिनीनी तो संदेश अगदी व्यवस्थीत नागरिकांपर्यंत पोहोचवला . तशा सुंदर प्रतिक्रिया नागरिकांन कडून येत होत्या. या पथनाट्यासाठी बी ए तेली सर, सौ भारती महाजन मॅडम यानी सहकार्य केले.


या पथनाट्यत भारत मातेचा एक चित्र्ररथ बैलगाडीवर बनवण्यात आला होता. तो नागरिकांचे लक्ष वेधून घेत होत. चौका चौकात या पथनाट्याचे प्रयोग सादर करण्यात आलेत. या प्रसंगी मुख्याधिकारी किशोर चौहान,प्राचार्य सी सी सपकाळे,पर्यवेक्षक जे व्ही तायडे, यानी सदर विद्यार्थिनी चे कौतूक केलं.या वेळी एस एम महाजन सर, अनिल नेमाडे सर, एम आय तदवी सर, बी जी लोखंडे सर, कल्पना शिरसात मैडम, प्रणाली काटे मैडम इत्यादी उपस्थीत होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!