थकबाकी नसल्याचा बनावट दाखला तयार करून बोजा उतरवला, गुन्हा दाखल
तासखेडा, ता. रावेर,मंडे टू मंडे न्यूज प्रतिनिधी : पतसंस्थेचे बनावट शिक्के तयार करून कर्जाचा बोजा असतानाही कर्ज नसल्याचा बनावट दाखला तयार करून बोजा उतरविल्या प्रकरणी महिला तलाठ्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- सोळा वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी, कोणत्या देशाने केले फर्मान
- महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांना रावेर तालुक्यात जोरदार प्रतिसाद,जावळेंना निवडून आणण्याचा मतदारांचा निर्धार
- रावेर तालुक्यात २२ लाखांचा गुटखा जप्त, गुटखा तस्करांमध्ये खळबळ
या बाबत अधिक माहिती अशी की, जय श्रीराम ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेकडून रावेर तालुक्यातील उदळी खुर्द येथील दिनकर किसन नेमाडे यांनी १२ लाख ३५ हजार रूपयांचे कर्ज घेतले होते.त्या नुसार त्यांच्या मालकीच्या शेती गट नं ८५/ब या उतार्यावर या कर्जाचा बोजा तारण म्हणून बसविण्यात आला होता. दिनकर किसन नेमाडे यांनी संस्थेचे बनावट शिक्के , लेटरपॅड तयार करून कर्ज नसल्याचा निलचा बनावट दाखला तयार केला.
त्या बनावट दाखल्याच्या आधारे उताऱ्या वरील एकूण १२,३५,१७७ रुपयांचा बोजा तालाठ्याकडून उतरविला व सदरची शेती नारायण कोळी याना २०१८ साली विकली.या बाबतची माहिती जय श्रीराम ग्रामीण बिगर शेतकरी पतसंस्थेचे दीपक भास्कर राणे यांना मिळाल्यावर त्यांनी कोर्टात दावा दाखल केल्याने कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार शेतकरी दिनकर नेमाडे, खरेदी करणारे नारायण कोळी आणि दाखला देणार्या उदळी खुर्द येथील तत्कालीन तलाठी रेखा जयस्वाल या तिघांच्या विरोधात सावदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.