गाते येथील ग्रामपंचायतीची माहिती अधिकारात माहिती देण्यास टाळाटाळ?
Monday To Monday NewsNetwork।
सावदा (प्रतिनिधी)। रावेर तालुक्यातील सावदा येथून जवळच असलेल्या गाते येथील रहिवाशी रामदास यशवंत बाऱ्हे यांनी दि.७-१२-२०२०रोजी गाते येथील ग्रामसेवक यांचे कडे सन २०१५ते२०१८या काळात शासनाकडून गावातील विकास कामासाठी किती निधी मिळाला व कोणत्या ठिकाणी विकास कामे केली याचे इस्टिमेट, बिले,ग्राम पंचायत ऑडिट रिपोर्ट,एमबीबुकाच्या प्रती,विकास कामे करणाऱ्या ठेकेदाराचे नाव लायसेन्स नंबर इ.बाबत माहिती मागितलेली असून ३०दिवसांत अर्जदारास माहिती पुरविणे बंधनकारक आहे.७-८ महिन्याचा कालावधी लोटला गेला तरी सुध्दा ग्रामसेवक माहिती देण्यास जाणून बुजून टाळाटाळ करीत असून या बाबत विचारणा केली असता त्यांनी भाष्य करणे टाळले असून या बाबत ग्रामसेवक मौन का धारण करीत आहे.
शासकीय माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये जनमाहिती अधिकारी तथा ग्रामसेवक यांचे कडे रितसर अर्ज सादर करूनही अर्जदारास योग्य ती माहिती मिळत नसून यामागे काही गौडबंगाल तर नाही ?या बाबत गटविकास अधिकारी यांचे कडे प्रथम अपील दाखल करण्यात येईल या सर्व प्रकाराची शहानिशा करून कारवाई करतील का ?ग्रामसेवक यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न तर केला जाणार नाही ना या कडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.असे तक्रारदार यांनी मंडे टू मंडे न्युज शी बोलताना सांगितले.