सावद्याच्या जवानाची कामगिरी, जम्मू काश्मीर सीमेवर घुसखोरांकडून २०० कोटीचे ड्रग सह पिस्तुल,९ राउंड,मागेझीन जप्त
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
सावदा, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : जम्मू-काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर भारतीय सैन्यांच्या जवानाने तीन ड्रग्ज तस्करांचा खात्मा केला आहे. जवानांनी त्यांच्याकडून ३६ किलो ड्रग्ज देखील जप्त केले आहे. विशेष म्हणजे या मोहिमेत जळगाव जिल्ह्यातील सावदा परिसरातील सुपुत्र यांचा समावेश होता. यामुळे ही बाब निश्चितच जिल्ह्यासह सावदा वासीयांसाठी कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे.
जम्मू-काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलाचे जवानांनी नुकतेच एका ऑपरेशन केले यामध्ये भारतीय जवानांनी रात्री सुमारे अडीच वाजता या तस्करांना पाहिले. त्यानंतर त्यांना रोखण्याचे प्रयत्न केले असता, गोळीबारात भारतात घुसखोरी करणाऱ्या ३ घुसखोरांचा खात्मा झाला. या कारवाईत आंतरराष्ट्रीय बाजारात २०० कोटी किंमत असेलेले सुमारे ३६ किलो ड्रग्स, पाकिस्तानी चलन तसेच १ पिस्तुल, १ मॅगजिन व ९ राउंड जप्त करण्यात आले आहे. मिशन फत्ते करणाऱ्या या पथकात जळगाव जिल्ह्यातील सावदा येथील दोन जवानांचा यांचा देखील समावेश होता.
दहशतवाद्यांन विरोधात केलेल्या या कारवाईत विशेष अभिमानाची बाब म्हणजे जिल्ह्यातील सावदा परिसरातील दोन जवान सहभागी होते. त्यांनी आपल्या अतुल्य पराक्रमाने या पाकिस्तानी घुसखोरांना कंठस्तान घातले. याकामगिरी बद्दल या सर्व जवानांना सैन्यदलातर्फे बक्षीस देखील जाहीर करण्यात आले असल्याची माहिती मिळत असून महाराष्ट्रातील गडचिरोली सीमेवर अत्यंत महत्त्वाची कामगिरी करत आहेत. त्यांच्या या कामगिरीने सावदावासियांची मान नक्कीच उंचावली आहे. त्यांचे या कामगीरी बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे,