सावदा आ.गं.हायस्कुल व ना.गो.पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील विध्यार्थीनी १२ वी परीक्षेत अव्वल : निकाल १०० टक्के !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
सावदा- मंडे टू मंडे वृत्तसेवा। सावदा नगरपालिका संचालित श्री आ.गं हायस्कुल व ना. गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालय मधील बारावी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षेचा निकाल काल ऑनलाइन पध्दतीने जाहीर झाला. यात २२० विध्यार्थी प्रविष्ठ झाले होते ते सर्व विद्यार्थी पास झाले असून १०० टक्के निकाल लागला आहे. निकालानुसार बारावी विज्ञान मध्ये ८८.८३ टक्के गुण मिळवून पाटील नम्रता पांडुरंग हिने प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळविला आहे. तर ८७.६६ % गुण मिळवत बेंडाळे सायली तुषार हिने दुसरा क्रमांक पटकावला असून यश संपादन केले.तसेच १२ वी कला शाखेत तपासे मनिषा काशिनाथ हिने ८३.६६ % गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला तर कोळी पूजा बाजीराव हिने ८३.३३ % गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला असून बारावी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षेचा निकाल १००% लागला आहे.
बारावी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षेतीत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन सावदा नगरीच्या नगराध्यक्षा सौ.अनिता येवले, उपनगराध्यक्ष विश्वास चौधरी, शिक्षण समिती सभापती- सौ. रंजनाताई जितेंद्र भारंबे, सावदा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सौरभ जोशी, गटनेते अजय भारंबे, विरोधी गटनेते फिरोजखान हबीबुल्ला खान पठाण, नगरसेवक राजेश वानखेडे , राजेंद्र चौधरी, तसेच सर्व आजी – माजी नगराध्यक्ष व सर्व सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका यांनी त्यांचे मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे. प्राचार्य सी. सी. सपकाळे, पर्यवेक्षक जे. व्ही. तायडे, यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतूक व अभिनंदन केले आहे.