सावदा – पिंपरुड रस्त्यावर झालेल्या अपघातातील रावेर येथील महिलेचा अखेर मृत्यू
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
रावेर, मंडे टू मंडे वृत्तसेवा। सावदा-पिंपरुड रस्त्यावर दोन चारचाकी इंडिका व फॉर्च्यूनर या दोघा गाड्यांचा २ डिसेंबरं सकाळी १०: ४५ वाजेच्या सुमारास मोठा अपघात झाला होता यात रावेर तालुक्यातील वाघोदा येथील भावना भरत सुपे वय-४८ यांचा मृत्यू झाला होता , तर 5 जण जखमी होते त्या जखमी पैकी तीन किरकोळ तर दोन गंभीर जखमी होते ,त्या गंभीर जखमीतील इंडिका गाडीतील रावेर येथील व्ही एस नाईक विद्यालयाचे चेअरमन यांच्या परिवारातील रेखा हेमंत नाईक(४०) राहणार रावेर, याचेवर जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असता उपचारा दरम्यान त्याचे काल शनिवार रोजी निधन झाले
याबाबत सविस्तर माहिती अशी, रावेर तालुक्यातील वाघोदा येथील केळीचे व्यापारी भरत सुपे यांच्याकडे लग्न असल्याने लग्न समारंभाच्या अनुषंगाने खरेदीसाठी घरातील दोन महिला व मुले जळगावकडे सकाळी फॉर्च्युनर गाडी क्रमांक DL10E6165 ने जात असताना, सावदा ते पिंपरुळ दरम्यान इंडिका गाडी क्रमांक MH19AP2612 यांचेत अपघात झाला. इंडिका गाडीतील रावेर येथील व्ही एस नाईक विद्यालयाचे चेअरमन यांच्या परिवारातील रेखा हेमंत नाईक(४०) प्रतीक हेमंत नाईक (२०) प्रीती हेमंत नाईक (१८) राहणार रावेर हे जळगाव वरून लग्न समारंभ आटपून घराकडे जात असता अपघातातील फॉर्च्युनर गाडी खुल्या शेतात घुसली व दोन मोठ्या झाडावर आदळली, हा अपघात एवढा भीषण होता की फॉर्च्यूनर गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे लिंबाच्या दोन वृक्ष तोडत शेजारच्या शेतात फेकली गेली.
या अपघातात वाघोदा येथील भावना भरत सुपे वय-४८ यांचा मृत्यू झाला, तर 5 जण जखमी झाले.मयत ह्या पंचायत समितीचे माजी उपसभापती भरत सुपे यांच्या पत्नी असून, दि.5 रोजी त्यांच्याकडे लग्न होते. यात असलेले अन्य प्रवासी गंभीर जखमी असून त्यांच्यावर सावदा व जळगांव येथे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर इंडिका गाडीतील रावेर येथील व्ही एस नाईक विद्यालयाचे चेअरमन यांच्या परिवारातील रेखा हेमंत नाईक(४०) याचा जळगाव येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने या गंभीर अपघातातील दोन महिलांचा मृत्यू झाल्याने दोघ परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.