रागिणी चव्हाण याना राज्य स्तरीय शिवकन्या महाराष्ट्र गौरव पुरस्कार
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
सावदा,ता.रावेर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय संस्था, नाशिक या राष्ट्रीय उपक्रमशील संस्थेच्या वतीने आरोग्य, सामाजिक ,शैक्षणिक ,सांस्कृतिक,प्रशासकीय आदी श्रेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणारा कोरोना योद्धा सन्मान तथा राज्यस्तरीय ” शिवकन्या महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2020 ” माँसाहेब जिजाऊआईसाहेबांच्या आशीर्वाद व सर्वांच्या प्रेरणेने 31ऑक्टोबर 2021 रोजी शिक्षण विस्तार अधिकारी सौ. रागिणी किशोरराव चव्हाण यांना देण्यात आला.
म्यागेसेस पुरस्कार विजेत्या पद्मश्री नीलिमा मिश्रा व नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डाँ सुधीर तांबे,आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डाँ बी व्ही पवार यांच्या हस्ते देण्यात आला.या वेळी संगमनेरच्या लोकनिय्यूक्त नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे व डी जे गुरव यांच्या विशेष उपस्थितीत कांताई नाट्यगृह जळगाव येथे देशदूत चे हेमंत अलोने याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात सौ.रागिणी किशोरराव चव्हाण यांना देण्यात आला.
पुरस्कार प्राप्त सौ.रागिणी किशोरराव चव्हाण या जळगाव जिल्हा परिषद येथे शिक्षण विस्तार अधिकारी(माध्यमिक) म्हणून कार्यरत असून त्या सावदा नगरपालिकेचे मुख्याधिकारी किशोर अशोकराव चव्हाण यांच्या अर्धांगिनी आहेत.
सौ.रागिणी किशोरराव चौव्हाण यांना ” शिवकन्या महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2020 “हा पुरस्कार मिळाल्या बद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.