शेतकऱ्यांना ८ तसा ऐवजी १० तास वीज पुरवठा करा – रावेर भाजपा किसान मोर्चा
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
सावदा, ता. रावेर, मंडे टू मंडे वृत्तसेवा। रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतात वीज ८ उपलब्ध राहणार असल्याचे महावितरण करून कळविण्यात आले असुन सदरचा निर्णय हा शेतकऱ्यांच्या हिताचा नसून आधीच शेतकऱ्यांना वेळी अवेळी शेतात फिरावे लागते म्हणून हा निर्णय अन्यायकारक असल्याने शेतकऱ्यांना ८ तासांऐवजी १० तास वीज पुरवठा उपलब्ध व्हावा, तसेच नादुरूस्त रोहित्र तातडीने दुरूस्त करावी अशी मागणी भाजपा किसान मोर्चाच्या वतीने सावदा महावितरण विभागाला निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी किसान मोर्चाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुरेश धनके, तालुकाध्यक्ष राहूल महाजन, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, शिवाजी पाटील, सी.एस.पाटील, श्रीकांत महाजन, बेटी बचाव बेटी पाढाओ च्या सैय्योजिका सारीका चव्हाण,माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, हिरा सोनवणे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.