स्वामीनारायण मंदिर सावदा तर्फे संक्रांती निमित्त शहरातून झोळी फेरी संपन्न
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
सावदा (प्रतिनिधि)। सावदा शहरातून दी 14 रोजी येथील स्वामीनारायण मंदिर तर्फे झोळी (भीक्षा) फेरी काढण्यात आली, मकरसंक्रांतीस दानाचे मोठे महत्व असून यादिवशी हरिभक्ताचे हातून दान व्हावे म्हणून सदर झोळी फेरी दरवर्षी काढण्यात येत असते सालाबाद प्रमाणे यंदा देखील सावदा मंदिरचे कोठारी स्वामी वासुदेवचरणदासजी यांचे प्रेरणेने सदर फेरी काढण्यात आली
सदर झोळी फेरी पाटील पूरा, इंदिरा गांधी चौक, संभाजी चौक, भोई वाडा, बुधवारा पेठ, गांधी चौक, गवत बाजार, शिवाजी चौक, आदी प्रमुख मार्गावरुन काढण्यात आली यावेळी यात स्वामी धर्मप्रसाददासजी, स्वामी तरुणप्रसाददासजी, स्वामी हरीप्रसाददाजसी, हरिभक्त शिवजी भारंबे, मेघ:शाम धांडे, प्रकाश भोळे, नीलेश खाचणे, चेतन वारके, ईशान पाटील आदी हरिभक्तानि सहभाग घेऊन नागरिकांचे घरो घरी जाऊन ही झोळी फिरविली यावेळी नागरिकांनी देखील या झोळी दान केले,