‘ त्या ‘ ट्रक चालकाचे अपहरण अनैतिक संबंधातून ? घातपाताची शक्यता? संशयित आरोपीला अटक
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
सावदा,मंडे टू मंडे वृत्तसेवा। रावेर तालुक्यातून एका ३५ वर्षीय तरुणाचे ट्रक सह अपहरण करून घातपात केल्याच्या संशयावरून सावदा पोलिसांनी एकाला अटक केली असून सदरील ट्रक परस्पर विक्री केल्याचे निष्पन्न झाल्याने ३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान त्या ट्रक चालकाचे अपहरण अनैतिक संबंधातून झाल्याची चर्चाही परिसरात जोरदार सुरू असून घातपाताची शक्यता ही व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक चौकशी केली असता मिळालेली माहिती अशी की, रावेर तालुक्यातील लहान वाघोदा खुर्द येथील रहिवासी याकूब गयासुद्दीन पटेल वय ३५ हा त्याची मालवाहू ट्रक (एम एच १९ सी वाय ६८४३) घेऊन जात असताना १५ मे २०२१ रोजी सकाळी १० वाजता ऋषिकेश उर्फ माधव विठ्ठल राव शेजवळ वय २४ रा. दावरवाडी तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद, राजू ठेगडे (पूर्ण नाव माहीत नाही) रा. पवन नगर नाशिक आणि संजय (पूर्ण नाव माहीत नाही) रा. औरंगाबाद यांनी संगनमताने याकूब पटेल यांचे अपहरण करून त्यांच्या ताब्यातील ट्रकची नागपूर येथे विक्री करून विल्हेवाट लावली होती. सुरुवातीला सावदा फैजपूर येथे याकूब पटेल यांची बेपत्ता झाल्याची खबर देण्यात आली होती. त्यानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यानंतर सावदा पोलिसांनी संशयित आरोपी ऋषिकेश उर्फ माधव विठ्ठलराव शेजवळ याला अटक केली . दरम्यान अपहरण झालेले याकूब पटेल यांना ठार मारले की काय ? या संशया बद्दल चौकशी सुरू केली असून याप्रकरणी तीन जणांवर सावदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सदरील संशयित आरोपीला ५ सप्टेंबर पर्यंत पोलिस कस्टडी मिळाली आहे. तसेच पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक लावंड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय देविदास इंगोले, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार, पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड व सहकारी करीत आहे.
या बाबत अधिक माहिती घेतली असता ट्रक चालक व मालक याकुब पटेलाचे नाशिक येथील एका महिलेशी ओळख संबंध असल्याचे बोलले जात असून या बाबतची माहिती ट्रकचे क्लिनर ला असावी असे तर्क वितर्क लढवले जात असून नवीन ट्रक असल्याच्या लालसे पोटी त्या तथाकथित महिलेसह संशयित आरोपी यांनी सामूहिक रित्या किंवा कसे सदरील घटना केली असावी अशी चर्चा सुरू आहे.? यासंदर्भात पोलिसांनी संशयितां सह याकूब पटेल यांचे मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स बाबत तपास केल्यास निश्चितच, अपहरण झाले असेल तर कशामुळे?घातपात तर झाला नाही ना ? तथाकथित महिले शी खरोखरच काही संबंध आहेत काय? असे अनेक प्रश्न अनुत्तरित असून गावात व परीसरात चर्चाही सुरू असल्याने या घटने संदर्भातील गुढ रहस्य उघडकीस येतील. व चर्चेला पूर्णविराम मिळेल,पण आरोपींमध्ये वाढ होईल एव्हढे मात्र खरे नक्की.