भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

नगरपालिकाराजकीयरावेर

राष्ट्रवादीच्या वाटेवरील सावदा भाजपच्या “कुंपणा” वरील नगरसेवकांमध्ये चलबिचल : तिकीट मिळेलच का ? चाचपणीवर भर !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

सावदा, मंडे टू मंडे वृत्तसेवा | पालिका निवडणुकीच्या धामधुमीला सुरवात होऊ घातली असून नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रातील वॉर्डांच्या, प्रभागांची  प्रारूप रचना तयार करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने निर्गमित केले असून २३ तारखेपासून या रचनेच्या तयारीस सुरुवात झाली आहे. निवडणुकीला अवघे ३ महिने शिल्लक असून अजून कोणत्याही राजकीय पक्षाने पत्ते उघड केलेले नाही. तरीही नगरसेवकांमध्ये अस्वस्थता असून विशेषतः माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने बरेचशे राजकीय समीकरणे बदलली असून त्यांचे समर्थक मानले जाणाऱ्या व राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेले भाजपमधील विद्यमान नगरसेवक भाजपच्या नगराध्यक्षासह १० नगरसेवक यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत हजेरी लावून आपली पुढील वाटचाल राष्ट्रवादीच्या घड्याळावर असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र भाजपला जय श्री राम करून राष्ट्रवादीचे घड्याळ हातांवर बांधल्यावर उमेदवारी मिळेलच का ? यांची शंका असल्याने ही चाचपणी सुरू केली आहे. कारण तेथे आधीच सावदा राष्ट्रवादीवर एकाधिकार असलेले माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक राजेश वानखेडे यांचे जुने सहकारी नगरसेवक व कार्यकर्ते हक्क सांगून आहेत. त्यामुळे भाजपला फारकत देत नव्याने राष्ट्रवादीत गेल्यास उमेदवारीचा ताळमेळ कसा बसेल ? अशी शंका ‘कुंपणा’ वरील नगरसेवकांमध्ये असल्याचे दिसत आहे. त्यातील काही नगरसेवक अपक्ष उमेदवारीच्या तयारीत असल्याची ही खात्री लायक चर्चा आहे.

पालिकेची सार्वत्रिक निवडणूक नोव्हेंबर-डिसेंमबरं मध्ये होऊ शकते किंवा ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून लांबणीवर पडू शकते… तत्पूर्वी भाजपने सन २०१६ मधिल निवडणूकत माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली सावदा नगरपालिकेवर कमळ फुलले होते. मात्र आता खडसेंनी राष्ट्रवादी प्रवेश केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बरीचशी गणित बदलली असून बरीचशी बदलणार आहे. यापाठोपाठ सावदा पालिककेतील ११ पैकी १० नगसेवक खडसेंसोबत आहे अपात्रता टाळण्यासाठी त्यांनी तूर्त राष्ट्रवादी प्रवेश केलेला नाही. मात्र, राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर तिकडून उमेदवारी मिळेलच का ? याची खात्री नसल्याने याबाबत त्यांच्यात चलबिचल आहे. त्यातील भाजपचे काही नगरसेवक अपक्ष उमेवदारीच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. कारण तेथे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक राजेश वानखेडे यांचे समर्थक देखील हक्क सांगून आहेत. वानखेडे यांनी गेली पंचवार्षिक निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर लढवली होती व कडवी झुंज देत लोकनियुक्त नगराध्यक्ष पद थोड्याने हुकले होते त्यांचे ७ नगरसेवक निवडून आले होते. राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत भाजपचे सभागृहातील नगरसेवक हजर राहण्याचे भाकीत मंडे टू मंडे ने वर्तविले होते आणि ते खरे ही ठरले होते. आता खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाने समर्थक राष्ट्रवादीच्या वाटेवर आहे. त्यामुळे बऱ्याच वार्डात वानखेडे व माजी मंत्री खडसे यांचे नव्याने प्रवेश करणारे समर्थक उमेदवारीचे दावेदार असल्याचे सांगत आहे. त्यामुळे पक्षातील जुन्या सहकाऱ्यांना डावलने कसरत असून त्यामुळे आगामी काळात पक्षांतराला वेग येणार हे निश्चित ! मात्र, मतदारांसाठी मनोरंजनाची कमतरता नसल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी राष्ट्रवादीकडून उमेदवारांच्या चाचपणीस सुरवात झाली आहे.

दुसरीकडे भाजपच्या गोटात मात्र भयाण शांतता असून कुठलीच हालचाल भाजपकडून दिसून येत नाही. त्याला कारण भाजप शहर कार्यकारिणीची कार्यकाळ मुदत संपून कित्येक महिने उलटूनही शहर कार्यकारणीसाठी पक्षाकडून नावे घेतली गेली खरी मात्र, अद्याप भाजपला नविन कार्यकारणी जाहीर करता आलेली नाही. खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशापर्यंत सावदा भाजपची सूत्रे खडसे कुटुंबीयांकडून हलत होती. परंतु आता परिस्थिती बदलल्याने भाजपा शहरातील सूत्र कुणाचा हातात जातात हे अद्याप स्पष्ट झाले नसून भाजपकडून सद्यातरी सावध भूमिका घेतली जात असल्याचे दिसून येत आहे.

भाजपकडे सद्या १ नगसेविका
२०१६ मध्ये पालिका निवडणुकीनंतर नगराध्यक्षांसह १०+१ नगरसेवकांच्या गटाची नोंदणी झाली होती. या गटातील खडसे समर्थक १० नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर तर, एकमेव सौ.रंजना जितेंद्र भारंबे या १ नगरसेविका सध्या भाजपच्या तंबूत आहे. त्यांचे पती जे.के.भारंबे भाजपा शहराध्यक्षपदाचे दावेदार मानले जात आहे. भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या व राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर हजेरी लावणाऱ्या नगराध्यक्षांसह ९ नगरसेवकांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस बजावली गेली आहे.

दरम्यान, राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांचं महाविकास आघाडी सरकार सत्तेत आहे. पण हे तीनही पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र येण्याची शक्यता धुसर आहे. काँग्रेसनं यापूर्वीच एकला चलोची भूमिका जाहीर केली आहे. तर शिवसेना व राष्ट्रवादीकडून अद्याप यावर स्पष्टपणे भाष्य करण्यात आलेलं नाही. तर भाजपकडून तीनही पक्षांविरोधात आघाडी उघडली आहे. मात्र स्थानिक पातळीवरील समीकरणे अत्यंत वेगळी असून आघाडीच्या माध्यमातून लढण्याची शक्यता धुसर असून शिवसेना आ.चंद्रकांत पाटील व माजी मंत्री एकनाथ खडसे याचे राजकीय वैर जगजाहीर आहे त्यामुळे त्याच्यात मनोमिलन होणे अवघड आहे. मात्र येणाऱ्या काळात राजकीय समिकरणे काय जुळतात त्यावर मतदारांचे लक्ष लागून आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!