भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

BREAKING : पीक विमा प्रकरणी सावदा येथील बँकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

सावदा, ता.रावेर, मंडे टू मंडे वृत्तसेवा : शेतकऱ्यांना फळ पीक विम्याची रक्कम देण्यास बँका टाळाटाळ करत असल्याचे आरोप होत असतांना याप्रकरणात बँकांवर गुन्हे दाखल केल्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी देण्यात आले होते त्यानुसार सावदा पोलीस स्थानकात आज शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आल्याने बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी सविस्तर माहिती अशी, शेतकर्‍यांकडून फळ पीक विम्याच्या संदर्भातील विमा कंपन्या नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करत असल्याचे आरोप शेतकर्‍यांनीकडून करण्यात आले होते. हवामानावर आधारित पुनर्रचीत पीक विमा योजनेबद्दल अनेक तक्रारी करण्यात आल्याने याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडून मागील महिन्यात बँकांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र काही दिवसांपूर्वी झालेल्या डीपीडीसीच्या बैठकी याप्रकरणात कृषी खात्यातर्फे दिरंगाई होत पाढे वाचण्यात आल्याने वातावरण चांगलेच तापल्याने कृषी अधिकार्‍यांकडून लवकरच गुन्हे दाखल करण्याची ग्वाही देण्यात आली होती. यानुसार सावदा पोलीस स्टेशनला याप्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

फिर्यादार मयूर भामरे प्रभारी कृषी अधिकारी रावेर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तत्कालीन शाखा प्रबंधक नामे- राम रहीश यादव (कार्यकाळ २५/४/२०१९ ते १२/११/२०२०) बँक ऑफ बडोदा शाखा सावदा आणि शाखा प्रबंधक गणेश तळेले (कार्यकाळ दि.१३/११/२०२० ते आज पावेतो बँक ऑफ बडोदा शाखा सावदा) यांच्या विरोधात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.३१/१०/२०१९ ते दि.११/८/२०२१ या कालावधीमध्ये शासनाचे पुनर्रचीत हवामान आधारीत फळपिक विमा योजना (अंबिया बहार) कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग शासन निर्णय क्र. फवियो-२०१९/प्र. क्र.२०२/१०-ऐ. दि.३१/१०/२०१९ अन्वये पारीत झालेल्या आदेशाचे पालन न केल्यामुळे जिल्हाधिकारी जळगाव (लोकसेवक) यांनी पारीत केलेले आदेश क्र.जाक्र./सां/फळपिक विमा/तक्रारी/१६१७/ २०२१ जिअकृअ जळगाव दि.२५/५/२०२१ अन्वये आदेशाची अवज्ञा करण्यात आली आहे. यामुळे राम रहीश यादव आणि गणेश तळेले यांच्या विरोधात सीसीटीएनएस गुरनं १३४/२०२१; भादंवि कलम-१८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पुढील तपास सपोनि देविदास इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश पाटील हे करत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!