सावदा राष्ट्रवादीच्या बैठकीत सभागृहात आमने-सामने थाटणारे दोन गट एकत्र येणार ? शहर वासीयांचे लक्ष लागून
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
सावदा, ता. रावेर : मंडे टू मंडे वृत्तसेवा | सावदा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आज आढावा बैठक आयोजित करण्यात आली असून यात खडसे समर्थक असलेले मात्र, सद्या भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले नगरसेवक व नगरसेविकांचे आप्त सहभागी होतात का ? याकडे राजकीय वर्तुळासह शहरवासीयांच्या नजरा लागून आहे.
आज जेहरा मॅरेज हॉल येथे दुपारी ४ वाजता सावदा राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या आगामी जिल्हा संपर्क दौर्याबाबात व पक्ष कार्यकरणीचा आढावा आणि शहरात शाखा उदघाटन बाबतचे कार्यक्रम ठरविणे बाबत चर्चा तसेच शहरातील विविध पदाधिकारी व कार्यकर्तेचा पक्ष प्रवेश यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून आगामी येणाऱ्या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेच्या दृष्टीने महत्वाची बैठक मानली जात असून गेली चार ते साडेचार वर्षे पालिका सभागृहात सातत्याने आमने-सामने येत असलेले पालिकेतील भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या मात्र खडसेचे समर्थ असलेले पदाधिकारी व सभागृहातील विरोधी गट हे दोन गट बैठकीच्या निमित्ताने एकाच पक्षाच्या झेंड्याखाली एकत्र येणार का ? या बैठकीला हजेरी लावणार का याबाबत शहरात चर्चेला उधाण आले असून याबाबत राजकीय तर्क वितर्क लावले जात आहे. या बैठकीला शहर राष्ट्रवादी कडून कार्यकर्ते, नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करणात आले आहे.
तसेच दोन दिवसापूर्वी जिल्हा बँक संचालकपदाचा राजीनामा देऊन खळबळ उडवून दिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील व जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणीताई खडसे हे पाटील यांच्या राजीनाम्यानंतर प्रथमच एकाच व्यासपीठावर येणार असल्याने या बैठकीला अधिक महत्व प्राप्त झाले असून रवींद्र पाटील आणि जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे हे या आढावा बैठकीला कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत ते राजीनाम्या संदर्भात काय भाष्य करतात याकडे राजकीय मंडळींचे लक्ष लागून आहे.