अंतर्गत राजकीय कुरघोळीत अडकले सावदा भाजप शहराध्यक्ष पदांच्या निवडीचे घोडे !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
सावदा, ता.रावेर मंडे टू मंडे वृत्तसेवा : येत्या काही महिन्यांवर पालिका निवडणुक होऊ घातली असतांना भारतीय जनता पार्टीची शहर कार्यकारणीचा कार्यकाळ संपून कित्येक महिने उलटूनही भाजपला नवीन शहराध्यक्ष जाहीर करता आलेला नाही.माजी मंत्री एकनाथ खडसेंचे समर्थक मानले जाणारे भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले नगरसेवक भाजपला जय श्री राम करणार असल्याचे त्यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीला हजेरी लावून आधिच स्पष्ट केल्याने नगरपालिकेत भाजप कागदोपत्री सत्तेतील पक्ष असल्याचे स्पस्ट झाले आहे .
सद्यस्थितीत भाजपच्या तंबूत सौ. रंजना भारंबे या एकमेव महिला नगरसेविका आहे. शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची संख्या व मर्जीतील व्यक्तीची वर्णी लागावी यासाठी प्रयत्न व अंतर्गत डावपेच सुरू असल्याने शहराध्यक्ष जाहीर करण्यास मुहूर्त मिळत नसल्याची माहिती मिळत आहे.
एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाने सावदा भाजपमध्ये शुकशुकाट असून मरगळ आल्याची चर्चा शहरात होत असून नेहमी रेलचेल असणाऱ्या भाजपमध्ये कुठलीच हालचाल दिसून येत नाही. भाजप शहर कार्यकरणीचा ३ वर्षाचा कार्यकाळ असताना २८ जानेवारी २०१६ ला झालेल्या निवडीला तब्बल साडेपाच वर्षाच्या वर कालावधी उलटला असताना शहराध्यक्ष पदा साठी सात ते आठ इच्छुकांची नावे घेतली गेली परन्तु अद्याप भाजपला नविन शहराध्यक्ष जाहीर करता आलेला नाही.
शहर भाजप मध्ये नाथाभाऊं यांच्या राष्ट्रवादी प्रवेशापर्यंत नाथाभाऊंचा एक गट, गिरीश महाजन यांचा दुसरा गट व पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तू जामनेर गटाचा कि मुक्ताईनगर गटाचा असा प्रश्न अनेक लोक प्रत्यक्ष विचारत आणि अशावेळेस त्यांच्याकडून “आम्ही कमळाचे म्हणजेच भाजपचे” असे उत्तर दिले जाई असा तटस्थ कार्यकर्त्यांचा तिसरा गट असे ३ गट होते. मात्र आता परिस्थिती बदली असल्याने राष्ट्रवादीच्या वाटेवरील भाजपच्या विद्यमान नगरसेवकांच्या स्पष्ट भूमिकेने भाजपकडे सद्या एकमेव नगसेविका सौ. रंजना जितेंद्र भारंबे या नगरसेविका भाजपकडे आहे. भाजप शहराध्यक्ष पदासाठी त्यांचे पती शहर उपाध्यक्ष जितेंद्र भारंबे (जे.के) हे रेसमध्ये आघाडीवर होते. त्यांचा नागरिकांशी असलेला दांडगा जनसंपर्क, पक्षाच्या माध्यमातून नागरिकांची घरोघरी जाऊन निराधार योजनेची केलेली कामे व मागील निवडणुकीत नंबर दोन ने सर्वाधिक मताधिक्य घेऊन निवडून आलेल्या नगरसेविका सौ. रंजना भारंबे यांनी इतर नागरसेवकांसोबत राष्ट्रवादी न जाता भाजप पक्षात राहण्याच्या त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे पक्षनिष्टेची पावती म्हणून पती जे.के.भारंबे यांना शहराध्यक्ष पदांची माळ त्यांच्या गळ्यात टाकण्यात येणार असल्याची चर्चा शहरातील नागरिकांमध्ये व पक्षीय वर्तुळातही जोरदार सुरू होती मात्र, ऐन वेळेला माजी शहराध्यक्ष राजेश भंगाळे यांचे नाव पुढे आले व त्यांच्या नावावरती जवळ जवळ शिका मोर्तब देखील झाला. परंतु भंगाळे यांना शहराध्यक्ष पदात रस नसल्याने त्यांच्याकडून नकार दर्शविण्यात आल्याची खात्री लायक माहिती सूत्रांकडून मिळत असून तशी चर्चाही पक्षीय वर्तुळात आहे.
श्री. भंगाळेच्या नकाराने पुन्हा जे.के. भारंबे यांचे नाव चर्चेत आले असून तालुका पातळीवरून भारंबे यांच्या नांवाला पसंती दिल्याचेही पक्षीय सूत्रांकडून माहिती मिळत असून अंतर्गत राजकारतातून मात्र, डावपेच खेळले जात आहे त्यामुळे त्यांचे नाव पिछाडीवर टाकण्याची फिल्डिंग लागल्याची माहिती आहे. मात्र, पक्षातील काही महत्वाच्या पदाधिकाऱ्यांकडून जे.के. भारंबे यांच्या नावाचा आग्रह असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे भारंबे यांना त्यांच्या पक्ष निष्ठेचे बक्षिस म्हणून शहराध्यक्ष पदांची माळ त्यांच्या गळयात पडते की पक्ष निष्ठेला खो- दिला जातो हे येणारा काळ सांगेल. यात आ. गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष राजुमामा भोळे व खासदार रक्षा खडसे काय भूमिका घेतात हे महत्वाचे ठरणार आहे. राजकीय डावपेचांच्या राजकारणात मरगळ आलेल्या भाजपला नवसंजीवनी देत मरगळ झटकली जाते की भाजपच्या राजकारणाच्या कुरघोळीत याकडे दुर्लक्ष केले जाते याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे. मात्र, कुरघोळीच्या राजकारणामुळे पक्षाला फटका बसण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा