थोरगव्हाणला उद्यापासून तीन दिवस भैरवनाथ यात्रोत्सव, पो. पा.अरविंद झोपे २६ वर्षापासून निभावत आहेत प्रथम पूजेचा मान …..
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
सावदा,ता. रावेर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। येथून जवळच असलेल्या थोरगव्हाण ता. रावेर येथे उद्यापासून दि १५,१६,१७ असे ३ दिवस असलेला भैरवनाथ महाराज यात्रोत्सव परंपरेप्रमाणे सुरू झाला. आज यात्रेनिमित्त काढण्यात येणाऱ्या गावातील तसेच पंचक्रोशीतील देव काठयांचे आगमन होईल. गावातील प्रमुख रस्त्यावरून पारंपारिक वाद्य डफ वाजत – गाजत देव काठ्यांची मिरवणूक काढली जात असून गावातील नागरिकांनी दर्शन घेतल्यानंतर सर्व देवकाठया गाव हाळाजवळ मुक्कामाला असतात .
दुसऱ्या दिवशी माघ शुद्ध पौर्णिमा रोजी भैरवनाथ महाराज यांच्या मुकुटाची विधीवत पूजाविधी करून चावळी वरून अभिमानाने “मिरवणूक काढत भैरवनाथ मंदिर बाण्यावरती मुकुट चढवले जाते व भैरवनाथ महाराज मुकुटाची विधीवत सजावट झाल्यानंतर पहिल्या पूजेचा मान पोलीस पाटिल यांना असतो” हा मान थोरगव्हाण गावचे कर्तव्यदक्ष पोलीस पाटील ” श्री अरविंददादा पंडित झोपे गेल्या २६ वर्षा पासून जोपासत आहेत”. त्यांना भैरवनाथ महाराजांचा सेवा व पूजा कार्याचा कृपाशीर्वाद प्राप्त झाला आहे याचा त्यांना अभिमान आहे हा सोहळा पाहण्यासाठी गावातील पंचक्रोशीतील नागरिक व्यवसायीक, व्यापार ,नोकरी कामानिमित्त नगर आणि महानगरात ,विदेशात स्थायिक झालेले आहेत ते गावी येऊन भक्तीभावाने मुकुटाचे दर्शन घेतात. श्रद्धा भक्ती म्हणून श्री भैरवनाथ महाराज यांचे चरण स्पर्श करून पुढील प्रगती कार्यासाठी प्रेरणा घेतात” तिसऱ्या दिवशी ” तोडर उपटण्याचा ” मानाचा कार्यक्रम संपन्न होतो त्यासाठी युवक तरुण वर्गाची मोठी उपस्थिती असते तोडर उपटणाऱ्या व्यक्तीचा सन्मान केला जातो ही बाब अभिमानाची समजली जाते या तीन दिवसीय यात्रोत्सव सोहळ्यात थोरगव्हाण गावचे पोलीस पाटील अरविंददादा झोपे स्वतः गावातील भैरवनाथ भक्तगणां समवेत यात्रेचे नियोजन करून सामाजिक सलोखा व शांतता बाबत लक्ष ठेवून असतात. करोणा नियमांचे पालन करून यात्रोत्सव सर्व भक्तांनी आनंद व उल्हासात साजरा करावा असे आवाहन करण्यात आले आहे.