दुःखद दुर्दैवी घटना;आईच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या मुलीचा खोल खड्ड्याने घेतला बळी
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
सावदा,ता.रावेर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। येथून जवळच असलेल्या मस्कावद ता.रावेर येथील आशाबाई प्रेमचंद चौधरी ह्या आईच्या निधनाचे वृत्त ऐकून अंत्यदर्शन व अंत्यसंस्काराला खानापूर येथे जात असता त्याचाही रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटारसायकल वरून पडून दुःखद अंत झाल्याची दुर्दैवी घटना सायंकाळी उशिरा रावेर जवळील भोकरी जवळ घडली.
या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील खानापूर येथील जनार्दन धांडे यांच्या आई तुळसाबाई बाबुराव धांडे ,वय ९० वर्ष , यांचे काल शुक्रवार रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाल्याने त्यांची मुलगी आशाबाई प्रेमचंद चौधरी,वय ६१ वर्षे रा मस्कावद सिम. यांना हे वृत्त कळताच तब्येत बरी नसतानाही आईचे अंत्यदर्शन व अंत्यसंस्कारासाठी निघाल्या ,दरम्यान
अंत्यसंस्कार दुसऱ्या दिवशी शनिवार दि,२ ला सकाळी ११ वाजता होणार असल्याचे मस्कावद येथील नातेवाईकांनी त्यांना समजावले. पण त्यांची तब्येत बरी नसतानाही त्या आईचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आणि अंत्यसंस्कारासाठी आपला मुलगा केतन बरोबर मोटार सायकलवर सायंकाळीच निघाल्या.
रावेर च्या पुढे भोकरी गावाजवळून पुढे गेल्यावर हॉटेल राजेश्वरीजवळून जात असताना रस्त्यावर असलेल्या प्रचंड खड्ड्यांमुळे त्या रस्त्याशेजारील खोल खड्ड्यात पडल्या आणि त्यांच्या डोक्यास गंभीर इजा होऊन त्या रक्तबंबाळ झाल्या.अपघात झाल्यानंतर येथून जाणाऱ्या काही युवकांनी पोलीस ठाण्याला आणि रुग्णालयाला कळवून ॲम्बुलन्सची मागणी केली.
ॲम्बुलन्स तेथे आली मात्र आशाबाई यांना ॲम्बुलन्समध्ये ठेवल्यावर ती स्टार्ट होईना. अखेर सर्वांनी धक्का देऊन ॲम्बुलन्स सुरू केली. जखमी आशाबाई यांना उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी आलेली १०८ क्रमांकाची ॲम्बुलन्स देखील नादुरुस्त असल्याचे तेथील युवकांनी सांगितले. त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले परन्तु त्यांचे निधन झाले. आईची व मुलीची अंत्ययात्रा एकाच दिवशी एकाच वेळी खानापूर येथे काल आईचं वृद्धापकाळाने निधन झाले त्याची अंत्ययात्रा आज सकाळी ११ वाजता खानापूर येथून निघणार,तर मुलीचे अपघातात निधन झाले त्याचीही अंत्ययात्रा आजच सकाळी मस्कावद. सिम. येथे सकाळी ११ वाजता निघणार असल्याने दुर्दैवाने माय-लेकीची अंत्ययात्रा एकाच दिवशी एकाच वेळी निघणार.