भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

“जिस का माल उसका हमाल ” केळी ट्रक चालक/मालकांची  एक तारखेपासून बंदची हाक…!

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

सावदा,मंडे टू मंडे वृत्तसेवा। येथून केळी ट्रक द्वारे विविध परप्रांतात वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जाते. प्रतिदिनी तीनशे ते चारशे ट्रक केळी सावदा परिसरातून केळीची वाहतूक होते.सदर ट्रक भांड्यातून दोघे बाजूचा  हमाली व सर्व खर्च काटला जातो, ट्रक चालकास मार्केट मध्ये त्रास होतो. तो कमी व्हावा यासाठी यावल रावेर तालुका ट्रक ओनर्स आसोशीयशन व परप्रांतीय ट्रक चालक मालक यांनी आज दि; २९ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मोर्चाचे आयोजन करून डायमंड ट्रान्सपोर्ट  ते जनता तोलकाटा असा मोर्चा काढण्यात आला होता मागण्याची पूर्तता त्वरित न झाल्यास १सप्टेंबर पासून चक्का जाम करण्यात येईल असा इशारा दिला.

 या बाबत अधिक माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील सावदा हे शहर केळीचे आगर म्हणून ओळखले जाते , केली उत्पादनासाठी परिसर प्रसिद्ध आहे येथून दररोज शेकडो ट्रक केळीची रोड मार्गानी परप्रांतासह राज्यात वाहतूक केली जाते. केळी वाहतूक होत असलेल्या ट्रकचालक व  मालकास त्यापोटी भाडे मिळत असते .याच भाड्यातून कमिशन काढले जाते, त्या यातून दोघे बाजूची  हमाली काढली जाते. केळी इच्छित स्थळी पोहोचल्यानंतर  खाली करण्यासाठी पैसे द्यावे लागतात, इच्छित स्थळी केळी भरलेली ट्रक वेळेवर पोचली नाही तर ट्रकचालकास, मालकास त्याचा दंड भरावा लागतो व त्याला मिळणाऱ्या  भाड्यातून ते वजा  करून उरलेली रक्कम भाड्या पोटी दिली जाते.  तसेच तिथे ट्रक खाली केल्यानंतर मार्केटमधील ट्रकमध्ये पत्तीचे एक ते दीड टन वजन कमी करूनही भाडे दिले जाते, ट्रक खाली झाल्यानंतर  मध्ये असलेली पत्ती(केळीचे पाने ट्रॅक मध्ये केळी संरक्षणासाठी लावलेली) व खराब झालेली केळी व त्यांचे काही वेस्टेज माल हा ट्रक मध्ये भरला जातो. तेथील व्यापारी हा कोठेही टाका ट्रक चालकाला सांगत असतात त्यामुळे ट्रक चालकांना एवढ्या मोठ्या शहरात कुठे टाकावी हा त्यांना प्रश्न पडतो सर्व स्वच्छता अभियान सुरु असताना सुद्धा त्यांनी कुठे ट्रक जर रस्त्याने खाली केली तर तिथे त्यांना दंड भरावा लागतो. अशा परिस्थितीत हे सर्व नुकसान ट्रक चालक व मालक यांना सोसावे लागते.  अशा दुहेरी संकटात त्यांना तोंड द्यावे लागते, जबाबदारीने वेळेवर ती ट्रक हव्या त्या ठिकाणावर माल घेऊन पोहोचवा लागतो वेळेवर माल न पोहोचल्यास त्यांना दंड अशा दुहेरी संकटा बरोबर त्यांना इंधन दरवाढीचाही फटका बसतो.ज्या व्यापाऱ्यांचा माल असेल त्यांनी हा खर्च सोसावा असे ट्रक ओनर असोशियन चे म्हणने असून या सर्व योग्य त्या मागण्या मान्य न झाल्यास दिनांक १ सप्टेंबर पासून चक्का जाम आंदोलन करण्यात येईल. यावेळी यावल रावेर तालुका ट्रक ओनर्स असोसिएशन चे अध्यक्ष सुरेश कोळंबे, उपाध्यक्ष खलील अहमद शेख करीम, दीपक पुंडलिक साळी,मोहम्मद हनिफ मोहम्मद ताहेर, आदी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!