सावदा येथे तरुणांची गळफास घेऊन आत्महत्या !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
सावदा, मंडे टू मंडे वृत्तसेवा : शहरातील स्वामींनारायण मंदिर परिसरातील देवकरवाडा परिसरात वास्तव्यास असलेला व मूळचा खिर्डी येथील रहिवासी असणारा ४३ वर्षीय तरुणांचे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवार रोजी उघड आली असून याप्रकरणी सावदा पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक असे, शहरातील स्वामींनारायण मंदिर परिसरातील देवकरवाडा येथे शरद महादेव कुरकुरे यांचे घरात भाड्याने कुटूंबासह वास्तव्याला असलेले भूषण दत्तात्रय महाजन (वय-४३, मूळ रा. खिर्डी ता. रावेर) हा राहायला होता. बाहेरगावावरून कामा निमित्त वास्तव्य असलेलया विवाहित असलेल्या भूषण महाजन या युवकाने घरात कोणीही नसताना नायलॉनच्या दोरीने गळ फास घेऊन राहत असलेल्या भाड्याच्या घरातील किचनमध्ये लोखंडी हुकाला दोरी बांधून आज ९ ऑक्टोबर सकाळी ८ ते दुपारी ३.३० (वेळ निश्चित नाही) वाजेच्या दरम्यान गळफास लावून आत्महत्या केली. सदरील घटनेची हर्षल प्रकाश इंगळे (रा. फैजपूर ता. यावल) याच्या खबरीनुसार सावदा पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तरुणाने आत्महत्या का केली हे आद्यप समजू शकले नाही. पुढील तपास सावदा पोलीस करीत आहे.