भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

पो.स्टे.ला नवीन स.पो.नी रुजू होताच महिलांचा  एल्गार,..आमच्या मुलाबाळांना सुखाचा घास खाऊ द्या, संसाराची राख रांगोळी होण्यापासून वाचवा – महिलांचे अश्रू अनावर

सावदा. ता.रावेर. मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l रावेर तालुक्यातील सावदा पोलिस स्टेशनला नवीन पोलिस अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील हे रुजू होऊन कार्यभार सांभाळताच दारू बंदी साठी महिलांनी सावदा पोलिस स्टेशनवरच आक्रोश मोर्चा काढत एल्गार पुकारला. त्रस्त महिला अवैध दारू विक्रील कंटाळून आक्रोश करत आम्हाला न्याय द्या. ,..आमच्या मुलाबाळांना सुखाचा घास खाऊ द्या, संसाराची राख रांगोळी होण्यापासून वाचवा असा आक्रोश करत महिलांचे अश्रू अनावर झाले.

बऱ्याच वर्षापासून महिला वर्ग गावातील जोमात सुरू असलेल्याअवैध दारू विक्री च्या त्रासाला कंटाळून त्यांच्या होणाऱ्या संसाराच्या राख रांगोळी मुळे त्रस्त झालेल्या आहेत . याबाबत तासखेड्याच्या महिलांनी एकत्र होऊन ग्रां पं सदस्य विनोद कोळी यांच्या मध्यस्थीने सावदा येथे नव्याने रुजु झालेले सहाय्यक पोलीस निरिक्षक विशाल पाटील यांना दि. ४ जुलै रोजी आक्रोश मार्चा काढून निवेदन देण्यात आले . सदयस्थिती महिलांनी रडत रडत मांडली आम्हाला न्याय दया ,गावातील अवैध दारूविक्री बंद करून आम्हाला आमच्या मुलाबाळाना सुखाचा घास खाऊ दया, दारूमुळे आमचे कुटूंब उघडल्यावर पडले असून आमच्या संसाराची राख रांगोळी होण्या पासुन वाचवा असे महिलांनी उपस्थित असलेल्या एपीआय विशाल पाटील यांच्या जवळ समस्या मांडल्या .

त्यावेळेस निवेदन देण्यात आले . निवेदनात दिव्या कोळी, सुपडाबाई कोळी ,आशा गोसावी ,कविता कुंभार, जिजाबाई पाटील, शारदा पाटील, रेखा विनोद तायडे, भावना पाटील, माया पाटील ,जनाबाई पाटील ,चंदा कोळी, संजना कोळी .रेखा बाम्हंदे, योगीता कोळी, संजीवनी कोळी, शोभा कोळी, ललीता कोळी ,सोनाली तायडे, जागृती कोळी, निर्मला कोळी ,शोभाबाई पाटील, माधूरी बाम्हंदे, नंदाबाई पाटील ,रेतना इंगळे ,करीष्मा इंगळे ,कविता बाम्हदे यांची नावे आहेत . नव्याने रुजू झालेले एपीआय विशाल पाटील कायम स्वरूपी दारू बंदी करतील का? महिलाना न्याय देतील का?याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागलेले आहे .

.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!