यावलरावेरसामाजिक

सावदा – फैजपूर शहराला जोडणारा धाडी नदीवरील पूल मोजतोयं शेवटच्या घटका … केव्हा उजळेल पुलाचे भाग्य?

सावदा/फैजपूर. मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l फैजपूर – सावदा या दोन मोठ्या शहरांना जोडणारा हा फैजपूर जवळील धाडी नदीवरील पूल याची आजची परिस्थिती पाहता ह्या पुलाची हलत अत्यंत बिकट झाली असून हा पूल कधीही कोसळू शकतो. रस्त्यावर असलेले खड्डे व तुटलेले कठडे पुलाच्या सुरक्षा कठड्यांपासून तर पूलाच्या उभ्या ढाच्याकडे आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल की हा कधीही कोसळू शकतो. केव्हाही कधीही कोसळू शकणारा या पुलाची आताची परिस्थिती साक्ष देत आहे. मात्र याकडे कोणालाही लक्ष द्यायला वेळ नाही का? की हा पूल कोसळून मोठी दुर्दैवी घटना घडण्याची वाट पाहिली जात आहे का? असाही मोठा प्रश्न पडतो.

लोक प्रतिनिधींचा डोळे असून आंधळेपणाचा आव?
या धाडी नदीवरील पुलाला जवळ जवळ ५० वर्ष झालेली असतानाही या पुलाची कधीतरी फक्त किरकोळ डागडुगी केली जाते. डागडुजी म्हणजे थातूरमातूर खड्डे बुजले जातात. परंतु “म्हाताऱ्या माणसांला नवीन अवयव जरी बसविले तरी शेवटी तो म्हाताराच राहतो” असला प्रकार या पुलाचा आहे. विद्यमान आमदार, खासदार , मंत्री,अधिकारी तसेच सर्व जबाबदार शासकीय तसेच सत्ताधारी राजकारणी या पुलावरून प्रवास करतात मात्र नेमकं इथून प्रवास करत असताना त्यांची गाडी हवेतून जाते की काय असा प्रश्न उभा राहतो.

सर्वसामान्य नागरिक तसेच कष्टकरी श्रमिक, महाविद्यालयीन विद्यार्थी – विद्यार्थिनी पायी व वाहनांवर असा हजारो वाहनांचा ताफा यावरून दिवसा – रात्री जात असताना अनेक वेळा अनेक किरकोळ दुर्घटना या ठिकाणी झाल्या आहेत पण केवळ सत्तेचे राजकारण करणारी व धूळफेक करून भावनिक आवाहन व जाहिरात बाजीत गुंतलेल्या लोकप्रतिनिधींना या प्रश्नांविषयी कुठलीही जाण नाही का? किंवा ते या विषयी काहीच का बोलत नाही ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या पुलाचे भाग्य आता तरी उजळेल का?

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!