भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

बनावट शिक्षक नियुक्तित तब्बल २०० कोटींचा घोटाळा, शिक्षण विभागात खळबळ

मुंबई,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्यात शिक्षण क्षेत्रातील एक मोठा घोटाळा समोर आला आहे. बनावट शिक्षक नियुक्ती प्रकरणात हा घोटाळा तब्बल १०० ते २०० कोटी रुपयांचा असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना अटक करण्यात आली आहे. हा घोटाळा नागपूर जिल्ह्यातील असून या बनावट शिक्षक नियुक्ती प्रकरणात नागपूर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. हा घोटाळा समोर येताच शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण..
बोगस कागदपत्रांच्या आधारावर मुख्याध्यापक पदास मंजुरी दिल्याप्रकरणी शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना गडचिरोलीतून अटक करण्यात आली. या प्रकरणात भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मुख्याध्यापक पराग पुडके यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी मुख्याध्यापक पराग पुडके याला शिक्षक पदाचा अनुभव नसताना तसेच शिक्षक म्हणून कोठेही काम केले नसताना थेट मुख्याध्यापक बनविण्यात आले. यासाठी नागपुरातील एस के बी उच्च प्राथमिक माध्यमिक विद्या मंदिर यादवनगर या शाळेचे बनावट शिक्षक असल्याचं कागदपत्र तयार केले. या बोगस बनवट कागदपत्रे तयार करून त्या आधारावर उपसंचालक उल्हास नरड यांनी आर्थिक व्यवहार करून नानाजी फडके विद्यालय देवताडा तालुका लाखनी जिल्हा भंडारा येथे मुख्यध्यापक पदावर मंजुरी दिली.

नागपूर जिल्ह्यात मागील अनेक वर्षांपासून बोगस भरती घोटाळ्याचे रॅकेट चालवले जात असून यांच्या द्वारे
नागपूर जिल्ह्यात ५७० पेक्षा अधिक शिक्षक आणि शिक्षित कर्मचाऱ्यांची बोगस पद्धतीने नियुक्ती झाल्याचा समोर आल्याचे नागपूरचे माजी आमदार नागे गाणार म्हणाले. त्यांनी असाही आरोप केला आहे की, शिक्षण भरती प्रत्यक्ष बंद असली तरी मंत्रालय स्तरावरून शिक्षक भरतीसाठी मान्यता मिळायची यासाठी आर्थिक व्यवहार व्हायचे आणि त्यातूनच शिक्षकांची नियुक्ती व्हायची. शिक्षणाधिकारी शिक्षण विभागातील अनेक बाबू आणि उपशिक्षणाधिकारी या सगळ्यांचा या रॅकेटमध्ये समावेश होता अनेक त्यांच्या बोगस शालार्थ आयडी तयार करण्यात आल्या त्यातून लाखो रुपयांचे आर्थिक व्यवहार झाले आणि हा सगळा घोटाळा असल्याचा आरोप नागो गाणार यांनी केला.

दरम्यान, मंत्रालय स्तरावर नेमलेल्या समितीत नागपुरात बोगस शालार्थ आयडी तयार करण्यात आल्याचा आरोपअसून नुकतेच मंत्रालयीन स्तरावर समितीच्या अहवालानंतर बनावट शिक्षक नियुक्त प्रकरणात यापूर्वी वेतन पथक आणि भविष्य निर्वाह निधी अधीक्षक निलेश वाघमारे यांना निलंबित करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!