शालेय पोषण आहारावर चोरट्यांचा डल्ला, १६ हजारांचा पोषण आहार चोरीला
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l माध्यमिक विद्यालयात शाळेच्या खोलीतून १५ हजार ७०० रूपयांचा शालेय पोषण आहार चोरून नेल्याची घटना ९ डिसेंबर रोजी घडली. ही घटना भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा गावातील शाळेत घडली. या संदर्भात २८ डिसेंबर शनिवार रोजी दुपारी १२ वाजता वरणगाव पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथून जवळच असलेल्या ओझरखेडा या गावाच्या माध्यमिक विद्यालय शाळेतील एका खोलीत शालेय पोषण आहार ठेवण्यात आला होता. दरम्यान, ७ ते ९ डिसेंबर दरम्यान अज्ञात चोरट्यांनी या खोलीत ठेवलेल्या १५ हजार ७०० रुपये किमतीच्या शालेय पोषण आहाराच्या पिशव्या चोरून नेल्या. मात्र हा प्रकार लक्षात आल्यावर शाळेचे मुख्याध्यापिका अपर्णा तुकाराम पाटील यांनी वरणगाव पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली त्यानुसार शनिवारी २८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता वरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.